Maharashtrachi Hasyajatra महाराष्ट्राची हास्यजत्रा घेणार प्रेक्षकांचा निरोप, कलाकारांनी केली भावुक पोस्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtrachi Hasyajatra, Maharashtrachi Hasyajatra news, Maharashtrachi Hasyajatra goes off air

Maharashtrachi Hasyajatra महाराष्ट्राची हास्यजत्रा घेणार प्रेक्षकांचा निरोप, कलाकारांनी केली भावुक पोस्ट

Maharashtrachi Hasyajatra Goes Off Air News: सध्या मनोरंजन विश्वातील लोकप्रिय शो म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा. आता महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

स्वतः हास्यजत्रेतील कलाकारांनी याविषयी संकेत दिलीयत. महाराष्ट्राची हास्यजत्रामधले कलाकार प्रियदर्शनी इंदलकरने हास्यजत्रेचा सेटचा फोटो पोस्ट केलाय.

भेटूया २ महिन्यांनी, अशी प्रियदर्शनी इंदलकरने पोस्ट केलीय. अशाप्रकारे महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो २ महिन्यांचा ब्रेक घेणार आहे.

(sony marathi Maharashtrachi Hasyajatra show will be goes off air for 2 months, priyadarshini indalkar shared emotional post)

महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील कलाकार आता शेवटच्या भागांचं शूटिंग करत आहेत. हे शूटिंग करत असताना कलाकार एकदम खुश आहेत.

हास्यजत्रेतील बिवाली अवली कोहली म्हणजेच अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ब्लॅक अँड व्हाइट फोटो पोस्ट केलाय. त्यावर २ महिन्यांनंतर भेटू असं कॅप्शन तिने लिहिलंय.

याशिवाय गौरव मोरेने सर्वांसोबत सेल्फी व्हिडिओ घेत आनेवाला पल, जानेवाला है असं गाणं लावलंय. शेवटचा दिवस, शेवटचं शूटिंग असं कॅप्शन देत कलाकार भावुक झाले आहेत.

याशिवाय हास्यजत्रेतील कलाकार रसिक वेंगुर्लेकरने चाहत्यांना दिलासा दिलाय. काळजी करू नका guys..शो बंद होत नाहीये. आम्ही MHJ टीम छोटीशी सुट्टी घेतोय. आम्ही लवकरच भेटू. खूप लवकर अशी पोस्ट करत रसिक वेंगुर्लेकरने चाहत्यांना माहिती दिलीय.

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो बंद व्हायचं कारण म्हणजे सोनी मराठीवर लवकरच कोण होईल मराठी करोडपतीचा नवीन सिझन सुरू होतोय. पुन्हा एकदा अभिनेते सचिन खेडेकर KBC मराठीचा नवीन सिझन होस्ट करणार आहेत.

29 मेपासून, सोम. ते शनि., रात्री 9 वाजता KBC मराठी सोनी मराठीवर पाहायला मिळणार आहे. अशाप्रकारे हास्यजत्रा २ महिन्याचा ब्रेक घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवायला रुजू होईल.