सानिया मिर्झाचा 'सोनी ये!' कडून 'हिरोज बिहाइंड द हिरो' पुरस्काराने सन्मान

Sony ye felicitated Sania Mirza with heroes behind the hero award
Sony ye felicitated Sania Mirza with heroes behind the hero award

शिक्षक बनणे हे अतिशय मोठे आव्हान आहे! पेन आणि पुस्तकं यापलिकडे हा पेशा असतो. शिक्षकाकडे संयम लागतो, शिकवण्यासाठी पॅशन लागते, आनंदी वृत्ती लागते आणि आपली वचने पाळण्यासाठीची पराकोटीची बांधिलती लागते, या सगळ्याबरोबर अर्थातच प्रेरक हेतू असावा लागतो! या सर्व गोष्टी लक्षात घेता, विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देणाऱ्या सर्व शिक्षकांना 'सोनी ये !' मानाचा मुजरा करत आहे.

सलग दुसऱ्या वर्षी वाहिनीतर्फे शिक्षकदिनानिमित्तच्या कार्यक्रमात 'हिरोज बिहाइंड द हिरोज' पुरस्कार सादर करण्यात आला असून, ख्यातनाम भारतीय टेनिस प्लेयर आणि टेनिस दुहेरीतील जगातील माजी अव्वल क्रमांकाची खेळाडू सानिया मिर्झा यांना क्रीडाक्षेत्रातील योगदान आणि त्यांच्या टेनिस अकॅडमीतून टेनिसमधून भविष्य घडवण्याच्या कार्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सानिया मिर्झा यांनी हैदराबाद येथे टेनिस अकॅडमी स्थापन केली आहे. येथे भारतीय टेनिसपटूंना जागतिक दर्जाचे प्रक्षिक्षण दिले जाते. तसेच खेळ आणि त्याचे खेळाडूंबद्दल मोठी राष्ट्रीय जबाबदारी पूर्ण करण्यासाठी इच्छुक असलेल्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत केली जाते.

पहिल्या फेरीवर आधारित/ पहिल्या फेरीच्या यशावर आधारित, यावर्षीच्या उपक्रमातसुद्धा आपल्या आदर्श व्यक्तिमत्त्वांवर विश्वास ठेवून विविध खेळाडू आणि चॅम्पिअन्सना प्रशिक्षित करण्यासाठी पूर्ण जीव ओतून काम करणाऱ्यांचा गौरव करण्यात येत आहे.

'हा पुरस्कार प्राप्त करताना मला अतिशय आनंद होत आहे, टेनिस क्षेत्राला पुन्हा काहीतरी देणे हे माझे स्वप्न होते आणि काही प्रमाणात बदल करू शकले ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. या पुरस्कारासाठी सोनी ये! ला मनापासून धन्यवाद देते', असे सानिया मिर्झा म्हणाल्या.

पहिल्या वर्षीच्या 'हिरोज बिहाइंड द हिरोज'ला भरघोस यश आणि सकारात्मक प्रतिसाद लाभला होता. हिरोज बिहाइंड द हिरोज 2017 मध्ये आमच्या ये टून्सनी अनुपम खेर, शाहीन मिस्त्री आणि शामक दावर यांची भेट घेतली आणि त्यांच्या कष्टांचाही आढावा घेतला. याशिवाय पंडित बिरजू महाराज आणि महावीर सिंग फोगट यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com