नयनरम्य ठरणार "सॉरी'! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

चित्रपटाच्या लोकेशन्समुळे त्या चित्रपटाचा चेहरामोहरा बदलून जातो. कोणत्याही चित्रपटात कथेप्रमाणेच लोकेशन्सही तितकीच महत्त्वाची ठरतात. लोकेशन चांगली असतील तर तीच प्रेक्षकांशी जास्त बोलतात. त्यामुळे कोणताही दिग्दर्शक उत्तमोत्तम लोकेशन्स आपल्या चित्रपटात दाखविण्याचा प्रयत्न करतात.

योगेश गोसावी दिग्दर्शित "सॉरी' या चित्रपटात विविध अशी तब्बल 45 उत्तम लोकेशन्स दाखविण्यात आली आहेत. भारतातील विविध 45 लोकेशन्सवर या चित्रपटाचे चित्रीकरण केले आहे. देशभरातील सात वेगवेगळ्या राज्यांमधील विविध लोकेशन वर चित्रीत केला जाणं हे "सॉरी' चित्रपटाचं खास वैशिष्ट्य आहे. या चित्रपटाची कथा एका नाटकाच्या लेखकाभोवती गुंफण्यात आली आहे.

sorry movie

चित्रीकरण देशभरातील सात राज्यांमधली या लोकेशन्समध्ये, जामा मस्जिद, पणजीतील बासालिका ऑफ बोम्स चर्च, धर्मशालातील बौद्ध मंदिर, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं प्रसिद्ध वैजनाथ शंकर मंदिर, अमृतसरमधील जगप्रसिद्ध सुवर्ण मंदिर या पाच महत्त्वाच्या विविध धर्मियांच्या प्रार्थनास्थळांचाही समावेश आहे. सात राज्यांमधील 45 लोकेशन्सवर चित्रीकरण करणं हे रसिकांना आकर्षित करण्यासाठी करण्यात आलेलं नसून कथानकाची गरज असल्याचं दिग्दर्शक योगेश गोसावी यांनी सांगितले. जर चित्रपटाच्या प्रत्येक दृश्‍यात फ्रेश लोकेशन्स असतील तर हा चित्रपट नयनरम्यच वाटणार यात शंका नाही. 

Web Title: sorry movie includes attractive location