सॉरी सलमान... 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

सुपरस्टार सलमान खान बॉलीवूड इंडस्ट्रीत नवनवं टॅलेंट आणतच असतो. काही अभिनेत्रींना त्याने त्यांच्या पडत्या काळात हात दिलाय अन्‌ आज त्या इंडस्ट्रीत फारच बिझी झाल्यात. सल्लूच्या मिडास टचनंतर कतरिना कैफ टॉपची हिरोईन झाली. श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिसलाही सलमानची अशी "किक' बसली की तिच्यामागे निर्मात्यांची रांगच लागलीय. सलमानसोबत "किक'मध्ये झळकल्यावर जॅकलिन चांगलीच लोकप्रिय झाली. "किक' तिच्या करिअरसाठी टर्निंग पॉइंट ठरला...

पण, आता सलमानच्या आगामी चित्रपटात काम करण्यासाठी तिने नकार दिल्याची चर्चा सगळीकडे रंगलीय. सलमानसोबत काम करण्यासाठी सर्व नायिका धडपडत असताना जॅकलीन का नाही म्हणतेय, असा प्रश्‍न अनेकांना पडलाय. खरं म्हणजे जॅकलीन सध्या कामात खूपच बिझी आहे. शूटसाठी तारखाच नसल्यामुळे तिने "जुगलबंदी' चित्रपटासाठी नकार दिलाय. सैफ अली खानसोबत सलमान "एसकेएफ' बॅनरखाली "जुगलबंदी'ची निर्मिती करतोय. त्यात मुख्य नायिकेसाठी जॅकलिनची निवड झाली होती; परंतु तिने नकार दिल्याने आता दुसऱ्या नायिकेचा शोध सुरू झालाय. जॅकलिनने "सॉरी सलमान' असा मेसेज करून आपली मजबुरी सांगितल्यानंतर सल्लूमियॉंने मोठ्या मनाने तिला माफही केलंय म्हणे... 

Web Title: sorry salman says jacqueline fernandez