साऊथ स्टार समंथा अक्किनेनी मालदीव्समध्ये करतेय एन्जॉय, ग्लॅमरस अदा पाहुन चाहते पडले प्रेमात

दिपाली राणे-म्हात्रे
Friday, 27 November 2020

सध्या समंथा मालदीव्समध्ये ज्या ज्या ठिकाणी जातेय तिकडचे फोटो शेअर करत चाहत्यांना अपटेड करतेय. वेगवेगळ्या अंदाजातील तिचे फोटो चाहत्यांना आणखीनंच प्रेमात पाडत आहेत.

मुंबई- साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री समंथा अक्किनेनी सध्या मालदीव्समध्ये एन्जॉय करतेय. मालदीव्समधील तिचे फोटो आणि व्हिडिओ ती शेअर करत असते. सध्या ती मालदीव्समध्ये ज्या ज्या ठिकाणी जातेय तिकडचे फोटो शेअर करत चाहत्यांना अपटेड करतेय. वेगवेगळ्या अंदाजातील तिचे फोटो चाहत्यांना आणखीनंच प्रेमात पाडत आहेत.

हे ही वाचा: करण जोहरने मधुर भांडारकरची मागितली माफी, मात्र सिनेमाच्या टायटलसाठी सांगितली ही गोष्ट  

सोशल मिडियावर सतत ऍक्टीव्ह असलेली समंथा अक्किनेनी मालदीव्समध्ये सुट्टी एन्जॉय करतेय. तिच्या स्टाईल आणि फॅशनची चर्चा तिच्या चाहत्यांमध्ये असतेच मात्र आता ती ज्या ज्या लोकेशन्सवर मालदीव्समध्ये फिरतेय त्या त्या ठिकाणच्या हटके गोष्टी ती प्रेक्षकांसोबत शेअर करतेय. यामध्ये तिचा दरवेळी वेगळा ग्लॅमरस अंदाज देखील पाहायला मिळतोय. समंथाच्या या फोटोवर चाहते तुटून पडले आहेत. चाहते तिच्या सोंदर्याची आणि तिच्या ग्लॅमरस लूकची, बीच फॅशनची स्तुती करत आहेत. 

Samantha Akkineni, Samantha Akkineni enjoying in Maldives, South actress Samantha Akkineni, Samantha Akkineni PICS, Social Media, Viral Photo, News 18 hindi

नुकताच एक फोटो समंथाने शेअर केला होता ज्यामध्ये तीने सफेद बिकनी घातली होती. हा फोटो  शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, तुम्हीच ब्रह्मांड आहात. थोड्या वेळासाठी स्वतःला एका माणसाच्या रुपात व्यक्त करत आहेत. या फोटोमध्ये तीने सफेद बिकनीसोबत डोक्यावर एक मोठी हॅट घातली आहे.

Samantha Akkineni, Samantha Akkineni enjoying in Maldives, South actress Samantha Akkineni, Samantha Akkineni PICS, Social Media, Viral Photo, News 18 hindi

समंथा केवळ वैयक्तिक आयुष्यातंच नाही तर मोठ्या पडद्यावर देखील तिच्या फिटनेसमुळे ओळखली जाते. ती दररोज काही तास हे खास व्यायामासाठी देत असते. समंथा लवकरच 'फॅमिली मॅन २' या वेबसिरीजमधून हिंदीमध्ये डेब्यु करणार आहे. या प्रोजेक्टसाठी समंथा स्वतः उत्सुक आहे.   

south actress samantha akkineni enjoying in maldives shares glamorous pic  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: south actress samantha akkineni enjoying in maldives shares glamorous pic