esakal | समंथाला बॉलीवूड अभिनेत्यासोबत करायचाय 'रोमान्स'
sakal

बोलून बातमी शोधा

Actress samantha akkineni

समंथाला बॉलीवूड अभिनेत्यासोबत करायचाय 'रोमान्स'

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

मुंबई - टॉलीवूडमधील अभिनेत्री समंथा अक्किनेनी (south actress samantha akkineni ) हिनं जेव्हा हिंदीतील फॅमिली मॅन नावाची मालिका केली तेव्हापासून ती जास्त लोकप्रिय झाली आहे. आता तिला बॉलीवूडमध्येही काम करायचे आहे. मात्र तिला अजूनही भीती आहे ती म्हणजे आपण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरु की नाही याची, त्याचबरोबर तिला बॉलीवूडमधील एका प्रसिध्द कलाकाराबरोबर (bollywood actor)ऑनस्क्रिन रोमान्सही करायचा आहे. त्याच्याविषयी तिनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. दाक्षिणात्य सिनेमामध्ये समंथा हे मोठं नाव आहे. तिचा फॅन फॉलोअर्सही मोठा आहे. (south actress samantha akkineni want to on screen romance with bollywood actor)

आतापर्यत समंथानं वेगवेगळ्या मोठ्या सेलिब्रेटींबरोबर काम करुन लक्ष वेधून घेतले आहे. सध्या तिची फॅमिली मॅनच्या सीझन २ मधील भूमिका चर्चेत आहे. त्यात तिनं वेगळी भूमिका साकारली आहे. तिच्या चाहत्यांना या भूमिकेची उत्सुकता आहे. समंथानं अद्याप एकाही हिंदी चित्रपटामध्ये काम केलेलं नाही. तिला त्यात काम करण्याची इच्छा आहे. तिनं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांबरोबर काम केले आहे. त्यामुळे तिची लोकप्रियताही मोठी आहे. सोशल मीडियावरही तिचा फॉलोअर्स मोठा आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून साऊथ मुव्ही इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असणारी समंथा आता हिंदीमध्ये येत आहे. तिनं बॉलीवूड हंगामाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये असे सांगितले आहे की, मी जेव्हा द फॅमिली मॅन सीझनच्या दुस-या भागात काम केले तेव्हाचा अनुभव खूप काही शिकवून जाणारा आहे. मला खरं तर हिंदी चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम करायला भीती वाटते. याचे एक कारण म्हणजे प्रेक्षकांच्या मोठ्या अपेक्षा. त्यांच्या अपेक्षांना आपण पात्र होऊ किंवा नाही ही गोष्ट कायम मनात सुरु असते.

हेही वाचा: Amruta Subhash : 'निर्माते माझ्याकडे अभिनेत्री म्हणून पाहत नाहीत'

हेही वाचा: इमरान हाश्मी vs सलमान खान; 'टायगर ३'मध्ये लढणार भारत-पाकिस्तानचे टायगर्स

मला आतापर्यत काही बॉलीवूड चित्रपटांच्या ऑफर आल्या आहेत. मात्र त्यात काम करण्याचा निर्णय मी घेतलेला नाही. मला जर संधी मिळालीच तर अभिनेता रणबीर कपूर (Ranbir kapoor) सोबत मला ऑनस्क्रीन रोमान्स करायला आवडेल. अशी इच्छा तिनं व्यक्त केलीय. गेल्या काही दिवसांपासून समंथाची आगामी वेबसीरिज द फॅमिली मॅन नावाची मालिका प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय आहे. अनेकदा या मालिकेच्या निर्मात्यांनी या मालिकेच्या प्रदर्शनाची तारीख बदलली आहे. आता जूनच्या पहिल्या आठवड्यात ही मालिका प्रदर्शित होणार आहे.

loading image