
मल्याळम चित्रपट 'Oru Muthassi Gadha' च्या माध्यमातून रजनी यांनी वयाच्या 65 व्या वर्षी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले होते.
मुंबई - फोटोशुट कोणी करावे, कधी करावे आणि कसे करावे याचेही काही अलिखित नियम असतात हे आता एका उदाहरणावरुन स्पष्ट झाले आहे. समजा ते केलेच तर सोशल मीडियावर शेयर केल्यावर त्याला मिळणा-या प्रतिक्रियांना सामोरं जाण्याचं धाडस अंगी असेल तर हा प्रयोग करायला हरकत नाही असे मत हे एका अभिनेत्रीच्या फोटोशुटवरुन स्वीकारावे लागेल.
दक्षिणेकडील अभिनेत्री रजनी चँडी यांनी एक फोटोशुट केले आहे. रजनी या सध्या 70 च्या घरात आहेत. त्यांनी ज्यावेळी हे फोटोशुट करुन सोशल मीडियावर ते व्हायरल केले तेव्हा त्यांना नेटक-यांच्या शेलक्या विशेषणांना सामोरे जावे लागले आहे. फार खालच्या पातळीच्या प्रतिक्रिया त्यांना त्यांच्या फोटोशुटमुळे मिळाल्या आहेत.
रजनी या मल्याळम बिग बॉसच्या स्पर्धकही राहिल्या आहेत. त्या आता त्यांच्या ग्लॅमरस लुकमुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. वास्तविक 70 वर्षांच्या रजनी यांनी साडी सोडून वेस्टर्न लुकमध्ये एक फोटोशुट केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली आहे. काहींनी या वयातही त्यांचा असणारा उत्साह दखलपात्र आहे असे म्हणून त्यांचे कौतूक केले आहे. तर काहींनी त्यांच्यावर जहरी टीका केली आहे.
आपल्या फोटोशुटविषयी रजनी यांनी सांगितले की, मला लोकांनी खूप ट्रोल केले. याचे कारण मी उतरत्या वयात फोटोशुट केले. काहींनी खूप टोकाची प्रतिक्रिया मला त्या फोटोंना दिली. अपमानास्पद शब्द वापरले. मी अजूनपर्यंत जीवंत कशी अशाप्रकारच्या प्रतिक्रिया मला मिळाल्या.
रजनी यांना आतापर्यत केवळ पारंपारिक वेशभूषेत प्रेक्षकांनी पाहिले आहे. त्यांचा हा अनोखा लूक कित्येकांच्या भुवया उंचावणारा होता. जीन्स आणि टॉपमधील वेशभूषेला लोकांनी नाकारले आहे.
मल्याळम चित्रपट 'Oru Muthassi Gadha' च्या माध्यमातून रजनी यांनी वयाच्या 65 व्या वर्षी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले होते. अभिनयाच्या क्षेत्रात येण्यापूर्वी त्या गृहिणी होत्या. त्यामुळे त्यांना नेहमी साडीच्या वेशभूषेत पाहिले गेले आहे.
काही दिवसांपूर्वी बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, माझ्यावर जसे टीका करणारे होते तसे माझे कौतूकही करणारेही होते. काहींनी मला असे म्हटले की, तुम्ही आता शो ऑफ करण्याऐवजी घरी बसून बायबल वाचा.
http://51 व्या वर्षी जेनिफर काय दिसतेय राव ! नव्या हॉट व्हिडिओला लाखो हिट्स
मला निगेटिव्ह कमेंट देणा-या बहुतांशी महिला आहेत. ज्यांनी माझ्या दोन फोटोंना आक्षेप घेतला होता. त्यातील एका फोटोत मी जीन्स घालून पाय पसरुन बसलेली दिसत आहे.