esakal | मुस्तफावर पहिल्या पत्नीचा 'घरगुती हिंसाचाराचा' आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

मुस्तफावर पहिल्या पत्नीचा 'घरगुती हिंसाचाराचा' आरोप

मुस्तफावर पहिल्या पत्नीचा 'घरगुती हिंसाचाराचा' आरोप

sakal_logo
By
युगंधर ताजणे

द फॅमिली मॅन (the family man season 2) या मालिकेपासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या प्रियामणिनं (priyamani) मुस्तफा राजशी (mustafa raj) लग्न केलं. आणि ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यासगळ्या प्रकरणात आता मुस्तफाच्या पहिल्या पत्नीनं यावर एक परखड प्रतिक्रिया दिली आहे. जी सोशल मीडियावर व्हायरलही झाली. त्यामुळे त्यांचे लग्न चर्चेत आले आहे. काही महिन्यांपूर्वी द फॅमिली मॅनचा दुसरा सीझन चर्चेत आला होता. त्यात प्रियामणिच्या भूमिकेनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर मुस्तफाच्या पत्नीनं केलेला आरोप त्या दोघांची डोकेदुखी वाढवणारा आहे. (south mustafa raj first wife claims priyamani marriage with her husband illegal yst88)

2017 मध्ये मुस्तफा आणि प्रियामणिचे लग्न झाले होते. वास्तविक 2013 मुस्तफानं त्याच्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला आहे. तीन वर्षांनंतर मुस्तफाच्या पहिल्या पत्नीनं धक्कादायक आरोप करुन सर्वांना चकीत केले आहे. त्यावरुन प्रियामणिला देखील खूप ट्रोल करण्यात आले आहे. तिला वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज येत आहेत. मुस्तफाची पहिली पत्नी आयशानं मुस्तफावर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले आहेत. प्रियामणि आणि मुस्तफा यांचे लग्न अवैध आहे. ते बेकायदेशीर आहे. त्याला काहीही अर्थ नाही. या सगळ्या आरोपांवर मुस्तफानं उत्तरही दिलं आहे.

आयशानं तिच्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं, माझा त्याच्याबरोबर अजून कायदेशीर घटस्फोट झालेला नाही. तेव्हा तो दुसरं लग्न कसं करु शकतो. त्यामुळे तो प्रियामणिचा स्वीकार करु शकत नाही. आम्ही अजूनपर्यत घटस्फोटासाठी कुठल्याही प्रकारचा अर्ज केलेला नाही. एकुण या प्रकरणानं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा: 'ए. आर. रेहमानला ओळखत नाही' म्हणणारे दाक्षिणात्य अभिनेते बालकृष्ण ट्रोल

हेही वाचा: Toofan Review; 'तुफान' एक छोटीशी वावटळ!

मुस्तफानं सांगितलं आहे की, आयशाला माझ्याकडून पैसे हवे आहेत. त्यासाठी ती अशाप्रकारचे आरोप करत आहे. त्या आरोपांना काहीच महत्व नाही. मला माझ्या जबाबदारीचे भान आहे. आयशा जे काही करते आहे ते खोटे आहे. एवढेच मला सांगायचे आहे. तिला माझ्याकडून पैसे हवे आहेत. त्यामुळे ती अशाप्रकारचे आरोप करत असल्याची प्रतिक्रिया मुस्तफा राजनं व्यक्त केली होती.

loading image