प्रसिद्ध गायक एसपी बालासुब्रमण्यम यांना राज्य सन्मानासोबत दिला शेवटचा निरोप

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Saturday, 26 September 2020

शनिवारी एसपी बालासुब्रमण्यम यांना तिरुवल्लुवर इथे शेवटचा निरोप देण्यात आला. यावेळी सेलिब्रिटींसोबत देशातील अनेक बड्या हस्ती आणि त्यांचे चाहते उपस्थित होते.

मुंबई- देशाचे दिग्गज आणि प्रसिद्ध गायक एसपी बालासुब्रमण्यम यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले आहेत. शुक्रवारी वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शनिवारी एसपी बालासुब्रमण्यम यांना तिरुवल्लुवर इथे शेवटचा निरोप देण्यात आला. यावेळी सेलिब्रिटींसोबत देशातील अनेक बड्या हस्ती आणि त्यांचे चाहते उपस्थित होते.

हे ही वाचा: सुनील ग्रोवरने शेअर केला मजेदार व्हिडिओ, 'ही' ट्रीक वापरुन एका पोळीच्याबनवल्या १० पोळ्या  

एसपी बालासुब्रमण्यम यांच्यावर तमिळनाडू पोलिसांनी २४ बंदुकी सलामी देत शनिवारी तमराइपक्कम इथे असलेल्या त्यांच्या फार्महाऊसवर अंतिम संस्कार केले गेले. एसपी बालासुब्रमण्यम यांचा मुलगा एसपी चरणने पुजारांच्या मंत्रोच्चारांमध्ये वडिलांवर अंतिम संस्कार केले. त्यानंतर २४ पोलिस अधिका-यांनी त्यांना बंदुकी सलामी दिली आणि मग त्यांचं पार्थिव दफन केलं गेलं. 

बालासुब्रमण्यम यांना शेवटचा निरोप देण्याआधी संपूर्ण तिरुवल्लुवरची सुरक्षा वाढवण्यात आली होती. जिल्ह्याचे एसपी अरविंदन यांनी सांगितलं होतं की, 'एसपी बालासुब्रमण्यम यांची अंतिम यात्रा पाहून आम्ही ५०० पोलिस कर्मचा-यांद्वारे सुरक्षा वाढवली आहे. सोबतंच ट्रॅफिक पोलिसांना देखील सावध केलं आहे जेणेकरुन लोकांना ट्रॅफिक समस्येला सामोरं जावं लागु नये.'

एसपी बालासुब्रमण्यम यांनी पाच दशकांपेक्षा जास्त काळ सिनेमासाठी काम केलं. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये १६ भाषांमध्ये ४० हजार पेक्षा जास्त गाण्यांना आवाज दिला. त्यांनी त्यांच्या हिंदी सिनेमाच्या करिअरची सुरुवात १९८१ मधील कमल हसन यांच्यावर चित्रीत झालेल्या 'एक दुजे के लिए' या गाण्याला आवाज देत केली होती. बालासुब्रमण्यम यांनी हिंदी सिनेमात शाहरुख खानच्या २०१३ मध्ये आलेल्या 'चेन्नई एक्सप्रेस' सिनेमातील एका गाण्यासाठी त्यांचा आवाज दिला होता.     

SP Balasubrahmanyam Funeral: Thalapathy Vijay, Vijay Sethupathi and fans  pay respects to the legendary singer

sp balasubramaniam funeral elaborate security and deployed around 500 personnel for singer funeral  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sp balasubramaniam funeral elaborate security and deployed around 500 personnel for singer funeral