क्रिती सांगतेय हेल्दी आणि आनंदी आयुष्याचं गुपित

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 August 2019

माझ्यासाठी आपण फिट असणे म्हणजे हेल्दी असणे, असा अर्थ आहे. याचाच अर्थ तुमची प्रतिकारशक्ती चांगली असते, तुमच्या शरीरातील संतुलन चांगले असते, तुमचा स्टॅमिना चांगला असतो. म्हणूनच मी म्हणते, फिट असणे म्हणजे हेल्दी आणि आनंदी असणे होय. 

-  क्रिती सेनन

स्लीम फिट - क्रिती सेनन, अभिनेत्री 

माझ्यासाठी आपण फिट असणे म्हणजे हेल्दी असणे, असा अर्थ आहे. याचाच अर्थ तुमची प्रतिकारशक्ती चांगली असते, तुमच्या शरीरातील संतुलन चांगले असते, तुमचा स्टॅमिना चांगला असतो. म्हणूनच मी म्हणते, फिट असणे म्हणजे हेल्दी आणि आनंदी असणे होय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Stretch and strengthen!! I know you’ve got my back @yasminkarachiwala #lovepilates

A post shared by Kriti (@kritisanon) on

मी आधीपासूनच बारीक असल्याने मला वजन कमी करण्याची कधी गरजच भासली नाही. मी उंचही असल्याने आहे त्यापेक्षा बारीक दिसते. मला मी शेवटचे कार्डिओ कधी केले, हे आठवतच नाही. कार्डिओ माझ्यासाठी उपयोगीही ठरत नव्हते. मात्र मला मसल्स बनवण्यासाठी व्यायाम करावाच लागतो. व्यायामासाठी मी थोडी आळशी आहे. त्यामुळे जिम करून घेण्यासाठी व स्वतःला व्यायामासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मी एक ट्रेनर घेतला आहे. वेट ट्रेनिंग करत राहणे हे खूप कंटाळवाणे आहे. त्यामुळे मी एकाच प्रकारचे व्यायाम न करता, त्यामध्ये विविधता आणते. 

Image result for Kriti Sanon exercise

नृत्य हा देखील एक चांगला वर्कआऊटचा प्रकार आहे. मी लहानपणापासून कथक करते, पण मला फक्त शास्त्रीय नृत्य करण्याऐवजी विविध नृत्यांचे प्रकार करायला आवडतात. आठवड्यातून 2 ते 3 वेळा व्यायामाऐवजी नृत्य करते. शूटिंगच्या निमित्ताने मला बाहेर राहावे लागते, अशावेळी मी जवळ कोणती जीम आहे का ते पाहते. तिथे जाऊन मला एकटीला शक्य असतील तेवढे व्यायाम करते. जिमही नसल्यास माझी ट्रेनर मला शेड्यूल ठरवून देते. त्याप्रमाणे मी धावायला जाते आणि योगासने करते. Image result for Kriti Sanon solo dancing

माझे डाएट खूप साधे आहे. सकाळच्या नाश्‍त्यामध्ये मी दोन अंडी, दोन ब्राऊन ब्रेड, एक ग्लास ज्यूस किंवा प्रोटीन शेक घेते. दुपारच्या जेवणात 2 चपाती, ब्राऊन राइस, भाजी किंवा मासे खाते. संध्याकाळच्या नाश्‍त्यामध्ये एक कप मक्याचे दाणे किंवा प्रोटीन शेक घेते. माझे रात्रीचे जेवण हे दुपारच्या जेवणापेक्षा हलके असते. यामध्ये भात आणि चिकन करी किंवा वरण, भात आणि भाजी खाते. झोपण्यापूर्वी आपल्याला काहीतरी खायला पाहिजे असे वाटल्यास, मी सूप किंवा सलाड घेते. खूप व्यग्र असल्याने खाण्यासाठी वेळ द्यायला न जमल्यास मी सोबत नेहमी सुकामेवा ठेवते. खजूर खाल्ल्यास तुम्हाला खूप लवकर ऊर्जा मिळते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special article on fitness of Kriti Sanon