
Ghar Banduk Biryani: घर बंदूक बिर्याणीचं विशेष गिफ्ट, विकेंडला सिनेमा पहा फक्त इतक्या रुपयांत
Ghar Banduk Biryani Special Offer News: नागराज मंजुळे यांची प्रमुख भूमिका असलेला घर बंदूक बिर्याणी सिनेमा रिलीज होऊन आता आठवडा उलटला आहे. प्रेक्षकांनी सिनेमाला चांगला प्रतिसाद दिलाय.
घर बंदूक बिर्याणीची दुसऱ्या आठवड्यात दमदार एंट्री झालीय. काल असलेली आंबेडकर जयंती आणि लागून आलेल्या शनिवार, रविवार सुट्टी या खास विकेंड निमित्त घर, बंदूक, बिर्याणी सिनेमाने सिनेरसिकांसाठी खास ऑफर दिलीय.
(Special gift of Ghar Banduk Biryani movie, watch weekend movies for just Rs 100)
हेही वाचा: What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
घर, बंदूक, बिर्याणी सिनेमाच्या सोशल मीडिया पेजवर हा खास खुलासा करण्यात आलाय. आज आणि उद्या खास विकेंडच्या निमित्ताने घेऊन आलो आहोत घर बंदूक बिर्याणीच्या तिकिटावर खास सवलत.
आत्ताच तिकीट बुक करा, फक्त आणि फक्त १०० रूपयांमध्ये. असं कॅप्शन लिहीत घर बंदूक बिर्याणी चे निर्माते झी स्टुडिओजने प्रेक्षकांना हि खास ऑफर दिलीय.
या ऑफर निमित्ताने जास्तीत जास्त प्रेक्षक घर, बंदूक, बिर्याणी पहायला गर्दी करतील यात शंका नाही.
घर बंदूक बिर्याणी सिनेमाच्या रिलीजआधीच नागराज मंजुळे यांची जोरदार हवा होती. नागराजचा चित्रपट म्हणजे चौकटीबाहेरचा चित्रपट, हे आता समीकरणच बनले आहे.
या चित्रपटात नागराज पोपटराव मंजुळे यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली असून ते एका तडफदार, प्रामाणिक पोलीस अधिकाराच्या भूमिकेत झळकत आहेत. नागराजच्या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय.
हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित 'घर बंदूक बिरयानी' ही त्याला अपवाद नाही. या चित्रपटात पोलीस आणि डाकूंची चकमक दिसत आहे.
हे डाकू हुबेहूब दिसावेत, यासाठी महाराष्ट्रातील विविध भागांतील कलाकार ज्याप्रमाणे त्यांनी वेचले.
त्याप्रमाणेच पोलीसही खरे वाटावेत, म्हणून त्यांनी काही रिअल पोलिसांनाच अभिनयाची संधी दिली. यात कोणी त्यांचा भाऊ आहे, कोणी मित्र आहेत.
त्यामुळे आता इतर चित्रपटांप्रमाणेच हा चित्रपटही रिअॅलिस्टिक असणार, हे नक्की!
झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, आटपाट निर्मित 'घर बंदूक बिरयानी' हा चित्रपट येत्या ७ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून
यात नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर, सायली पाटील, दीप्ती देवी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.