कॅलिफोर्नियामध्ये राहणा-या अभिनेत्री अश्विनी भावे सध्या काय करतायेत? वाचा अश्विनी यांची विशेष मुलाखत

स्नेहल सांबरे, प्रतिनिधी
Saturday, 18 April 2020

अभिनेत्री अश्विनी भावे देखील सध्या अमेरिकेतील कॅलिफोर्निया शहरात राहत आहेत. या कोरोना विषाणूची परदेशातील स्थिती कशी आहे? सध्या लॉकडाऊनमध्ये अश्विनी काय करतात? आणि याशिवाय त्या वूट वरील 'द रायकर केस' या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. एकूणंच या सगळ्याविषयी त्यांच्याशी केलेली खास बातचीत...

मुंबई- कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव सर्वत्र वाढत आहे. भारतालाही या कोरोना विषाणूचा फटका बसला आहे. यात चीन, इटली, अमेरिका सारख्या देशांचे जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भारतीय देखील परदेशात राहत आहेत. अभिनेत्री अश्विनी भावे देखील सध्या अमेरिकेतील कॅलिफोर्निया शहरात राहत आहेत. या कोरोना विषाणूची परदेशातील स्थिती कशी आहे? सध्या लॉकडाऊनमध्ये अश्विनी काय करतात? आणि याशिवाय त्या वूट वरील 'द रायकर केस' या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. एकूणंच या सगळ्याविषयी त्यांच्याशी केलेली खास बातचीत...

हे ही वाचा : हिंदी देखील सहजरित्या न बोलणारी सनी लिओनी घेतेय मराठीचे धडे.. सनीच्या तोंडून मराठी ऐकायचंय तर व्हिडिओ पहाच..

प्रश्न-  सध्या तुम्ही कॅलिफोर्नियामध्ये राहत आहात. तेथेही कोरोना विषाणूमुळे संपूर्ण लॉकडाऊन आहे तर लॉकडाऊनमध्ये तुम्हीही घरी आहात. तुम्ही घरी राहून ही लढाई कशी लढत आहात?

अश्विनी-  सूंपर्ण जगभरात सध्या बिकट परिस्थिती आहे. अमेरिकेतही बिकट परिस्थिती आहे. या परिस्थितीत सुख म्हणजे माझी मुलं. ती माझ्या समवेत आहेत तर मला छान वाटतं, त्यांच्यासोबत असताना काही वेळ या परिस्थितीचा विसर पडतो. ही लढाई कशाप्रकारे लढचे म्हणाल सतत बातम्या आम्ही पाहतं नाही. या कठीण परिस्थितीत नेहमीच मन प्रसन्न आणि आनंदी ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. 

प्रश्न- लॉक़डाऊनमध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आणि मुलांसोबत कशाप्रकारे वेळ घालवता?

अश्विनी-  लॉकडाऊनच्या काळात मला माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवायला मिळतो आहे. आम्हाला सगळ्यांना एकमेकांशी जास्त संवाद साधण्याची संधी मिळत आहे. आम्ही सकाळची न्याहरी, दुपारचं जेवण, रात्रीचे जेवण आम्ही सर्व एकत्र करतो. बरेचदा मुलांशी संवाद कसा साधावा हा प्रश्न पालकांना पडतो. तसाच प्रश्न मलाही पडतो. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यांमध्ये आम्ही वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत आहोत. आता माझी मुलं मोठी झाली आहेत. स्वतःचे विचार ते मांडू शकत आहेत. यातच मी आणि माझे पती किशोर मुलांसोबत फार महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली आहे. मी आणि किशोर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो. आमच्या क्षेत्रातले अनुभव आम्ही त्यांना सांगितले. एक पालक म्हणून आम्हाला मुलांना काय सांगायचयं हे त्यांना सांगायची संधी मिळाली. 

Ashwini Bhave celebrates her birthday with her family members in USA

प्रश्न- या कोरोना विषाणू दरम्यान तुम्ही स्वतःची कशाप्रकारे काळजी घेत आहात. 'फिट' या वेबसीरिजमधील कलाकारांसोबत आणि दिग्दर्शकासोबत तुम्ही पहिल्यांदाच काम केले. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?

अश्विनी-  या वेबसीरिजच्या निमित्ताने मला नवीन कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. सगळेच चांगले कलाकार आहेत त्यांच्यासोबत काम करताना फार मजा आली. बरेचशे मराठी कलाकारही या वेबसीरिजमध्ये आहेत. या वेबसीरिजचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांच्यासोबत मी पहिल्यांदाच काम करत आहे. मी आदित्यला बरेच वर्षांपासून ओळखते पण त्याच्याबरोबर काम करण्याची संधी पहिल्यांदाच मिळाली. त्याच्याबरोबर काम करून छान वाटलं. चित्रीकरणादरम्यान आम्ही खूप मजा केली.

प्रश्न-  या कोरोना विषाणू दरम्यान तुम्ही स्वतःची कशाप्रकारे काळजी घेत आहात. फिट राहण्यासाठी तुम्ही काय करता?

अश्विनी-  मी रोज नियमितपणे व्यायाम करते. योगामध्ये मी श्वसनाचा व्यायाम जास्त प्रमाणात करते आहे. बरेच वर्षांपूर्वी मी श्वसनाचे व्यायाम नियमितपणे करत होती पण आता ते मी पुन्हा करायला मी सुरवात केली आहे. त्याशिवाय मेडिटेशन देखील मी करते आहे. मी माझ्या आहारातलं सी जीवनसत्वाचे प्रमाण वाढवले आहे. कारण सी जीवनसत्व आपल्या शरीराची इम्युनिटी वाढवायला मदत करते. लॉकडाऊनमुळे घरी असल्याने आणि काहीही सुचत नसलं की माणसाला भूक लागते. तर मी सतत खाणं टाळते. एका वेळेला हेवी पदार्थ तर एका वेळेला लाईट पदार्थ खाण्याचा मी प्रयत्न करते आहे. माझ्या मते ज्याप्रमाणे आपण आपल्या शरीराची आणि आहाराची काळजी घेतो तसचं आताच्या स्थितीला आपल्या मनाचीही काळजी घेणंही तितकचं गरजेचे आहे.

प्रश्न- घराबाहेर पडल्यावर, बाहेरून घरी आल्यावर आणि घरात असताना तुम्ही कशाप्रकारची कशाप्रकारची काळजी घेता?

अश्विनी- कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर यांनी दिलेल्या आदेशानुसार 'शेल्टर इन प्लेस' म्हणजेच स्वतःच्या घरी राहणं याचं आम्ही सगळेच पालणं करत आहोत. कार्डशिवाय आम्ही घराबाहेर पडत नाही. बाहेर पडलोच तर तोंडाला फेस मास्क आणि हातात ग्लव्ह्ज घालूनच आम्ही बाहेर पडतो. बाहेर गेल्यानंतर लोकांपासून सहा फूटांच्या अंतरावर उभे राहतो. आणि घरी पडल्यावर मास्क आणि ग्लव्ह्जची लगेचच विल्हेवाट लावतो. रोज घर स्वच्छ ठेवते आणि दरवाजाचे हॅंडल्स रोज स्वच्छ साबणाच्या पाण्याने धुवून काढतो आहे. अशी सामान्य गोष्टीची आम्ही काळजी घेतो.

प्रश्न-  या कठीण परिस्थीत मानसिकदृष्ट्या कसं कणखर राहण्यासाठी काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं?

अश्विनी-  मानसिकदृष्ट्या आनंदी राहण्यासाठी मी माझ्या मनाला ज्या गोष्टी कराव्याशा वाटतील ते करते. मी टिव्हीवर सतत बातम्या पाहणं टाळते आहे. कारण बातम्या ऐकून मनाला फारच निराशा मिळते आहे. गेल्या काही दिवसांत बातम्यांमधून आशावादी असं काही ऐकायला मिळतच नाही आहे. त्यामुळे मी बातम्या पाहणं सहसा टाळते. माझी सगळी काम झाली की माझं मन ज्या गोष्टीमध्ये रमतं किंवा माझ्या आवडत्या छंदांना मी माझा वेळ देते. त्यामध्ये वाचन, नव्या रेसिपी ट्राय करणं, गाणी ऐकणं आणि गार्डनिंग या गोष्टी मला खूप आनंद देतात त्या मी करते. मी माझी हार्मोनियमचा सराव पुन्हा एकदा सुरू करणार आहे. त्यामुळे जितका वेळेचा सदउपयोग करता तेवढा मी करते आहे.

प्रश्न-  हिंदी-मराठी चित्रपटात काम केल्यानंतर आता तुम्ही 'द रायकर केस' या वेबसीरिजमधून वेबविश्वात पदार्पण करत आहात. काय सांगाल?

अश्विनी- मी वेबविश्वात पदार्पण करण्यासाठी फारच उत्साही आहे. कुठलही नवीन माध्यम हाताळताना मी खरचं खूप उत्सुक असते आणि मला नवीन गोष्ट ट्राय करायला आवडतात. बऱ्याच वर्षांनंतर मी पुन्हा एकदा हिंदीत काम करत आहे, त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांशी नव्याने ओळख होणार आहे. चाहत्यांसोबत पुन्हा एकदा संवाद सुरू होणार आहे. एकूनच या सगळ्या गोष्टींसाठी मी खूपच उत्सुक आहे.

प्रश्न-  वेबसीरिजमध्ये काम करण्याचा निर्णय तुम्ही कसा घेतला?

अश्विनी -  प्रत्येक वेळी काम करताना एखादी भूमिका जेव्हा मला ऑफर होते तेव्हा माझी भूमिका कशी आहे, दिग्दर्शक कोण आहे हे तर मी पाहतेच. पण सर्वात जास्त महत्व मी देते ते कथानकाला. मी भूमिका स्विकारताना असा विचार करते की, मी ऑडियन्समध्ये बसलेली असताना मला हे कथानक पाहायला आवडेल का? 'द रायकर केस'च्या बाबतीत माझं उत्तर अगदी सरळ होतं. या वेबसीरिजच्या बाबतीत माझं उत्तर होय हेच होतं. वेबसीरिच्या कथानकामुळे ही वेबसीरिज करण्याचा मी निर्णय घेतला.

प्रश्न-  या  वेबसीरिजमधील तुमची भूमिका कशाप्रकारची आहे  आणि या वेबसीरिजबद्दल तुम्ही काय सांगाल?

अश्विनी- या वेबसीरिजमध्ये माझी भूमिका फारच छान आहे आणि महत्वाची देखील आहे. मी साक्षी रायकर ही भूमिका साकारत आहे. साक्षी ही यशवंत रायकर यांची पत्नी आहे. या वेबसीरिजमध्ये सगळ्याच भूमिका महत्वाच्या आहेत आणि सगळ्याच भूमिकांची मांडणी फारच चांगली केलेली आहे.  

The Raikar Case Review: Ashwini Bhave Blows Your Mind In What ...

प्रश्न-  या वेबसीरिजमधील कलाकारांसोबत आणि दिग्दर्शकासोबत तुम्ही पहिल्यांदाच काम केले. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?

अश्विनी -  या वेबसीरिजच्या निमित्ताने मला नवीन कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. सगळेच चांगले कलाकार आहेत त्यांच्यासोबत काम करताना फार मजा आली. बरेचशे मराठी कलाकारही या वेबसीरिजमध्ये आहेत. या वेबसीरिजचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांच्यासोबत मी पहिल्यांदाच काम करत आहे. मी आदित्यला बरेच वर्षांपासून ओळखते पण त्याच्याबरोबर काम करण्याची संधी पहिल्यांदाच मिळाली. त्याच्याबरोबर काम करून छान वाटलं. चित्रीकरणादरम्यान आम्ही खूप मजा केली.

special interview with actress ashwini bhave


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special interview with actress ashwini bhave