HBD Aamir Khan : 'या' मुलीसोबत लग्न करण्यासाठी आमीर होता वेडा...

वृत्तसंस्था
शनिवार, 14 मार्च 2020

आमिर जरी त्याची पहिली पत्नी रिना दत्तापासून वेगळा झाला असला तरी आजही रिना त्याच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे...

बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान याचा आज 55वा वाढदिवस! त्याची सिने कारकिर्द आत्तापर्यंत एकदम परफेक्ट राहिली असून त्याचं वैयक्तिक आयुष्य देखील आता परफेक्ट सुरु आहे... पत्नी किरण राव आणि मुलगा आझाद सोबत आमीर खूपच खुश आहे.. आमीर जेवढं प्रेम आझादवर करतो तितकंच प्रेम तो इरा आणि जुनैदवर देखील करतो.. आमिर जरी त्याची पहिली पत्नी रिना दत्तापासून वेगळा झाला असला तरी आजही रिना त्याच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे...

अनुष्का शर्मा अभिनेत्री तर आहेच उत्तम; पण...

Image result for aamir kiran azad

2001 मध्ये आमिरचा 'लगान' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.. त्याचदरम्यान आमीर आणी रिनामध्ये सतत बिनसत असल्याच्या बातम्या येत होत्या.. 'लगान' सिनेमाच्यावेळी आमिर सिनेमाची सहनिर्माती असलेल्या किरण राववर प्रभावित झाला होता.. किरणचं तिच्या कामाप्रती असंलेलं प्रेम, ती ज्या उत्कटतेने आणि प्रोत्साहित होऊन काम करायची त्यावर आमीर खूप खूष होता आणि इथूनंच त्या दोघांमध्ये एकमेकांविषयी प्रेम निर्माण झालं... किरण रावसोबत लग्न करण्यापूर्वी अर्थातच आमिरला पहिली पत्नी रिनाला घटस्फोट द्यावा लागला.. काही जणांनी दिलेल्या माहितीनुसार, आमीरला रिनाला पोटगी म्हणून 50 कोटी रुपये द्यावे लागले होते. आमीर आणि रिनाचा घटस्फोट 2002 साली झाला. आणि त्यावेळचा हा सगळ्यात महागडा घटस्फोट असल्याची चर्चा होती...

Image result for aamir reena datta

आमीर आणि रिना यांनी प्रेमविवाह केला होता.. दोघांचेही कुटूंबिय त्यांच्या लग्नाला तयार नव्हते. पण आमीर आणि रिना एकमेकांपासून वेगळं राहू शकत नव्हते आणि म्हणून दोघांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं. कित्येक दिवस दोघांनी त्यांचं लग्न घरातल्यांपासून लपवून ठेवलं होतं. या दोघांनी जेव्हा लग्न केलं तेव्हा रिना शिकत होती त्यामुळे ती तिच्याच घरी राहून शाळेत येत-जात होती तर आमीर त्यावेळी 'कयामत से कयामत तक'ची शूटींग करत होता...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

Image result for aamir reena datta

Image result for aamir reena datta

लग्नाच्या काही दिवसांनंतर आमीरच्या  कुटूंबियांनी रिनाला स्विकारलं. मात्र, काही वर्षांनंतर रिना आणि आमीरमध्ये तक्रारी व्हायला सुरुवात झाली आणि त्यांच्यातल्या या तक्रारींना अभिनेत्री प्रिती झिंटा कारणीभूत असल्याचं म्हटलं गेलं. कारण आमीर आणि प्रिती त्यावेळी 'दिल चाहता है' सिनेमासाठी एकत्र काम करत होते आणि त्याचदरम्यान त्यांच्या अफेअर्सच्या चर्चांना उधाण आलं होतं.

Image result for aamir priti zinta

त्यावेळच्या माहितीनुसार, रिना याच कारणामुळे आमीरपासून वेगळं राहायला लागली होती. मात्र परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं कळताच प्रितीने घाबरुन आमीरसोबतच्या तिच्या अफेअरला नकार दिला... यानंतर आमिर आणि रिनामध्ये सगळं काही व्यवस्थित चालू होतं. त्यातंच त्याचं नाव किरण राव सोबत जोडलं जाऊ लागलं.. किरणसोबतच नातं आमीरने न लपवता तिच्यासोबत थेट लग्न करण्याचाच निर्णय घेतला.

Image result for aamir kiran rao

Image result for aamir kiran rao

आमिरच्या या निर्णयामुळे रिनाला चांगलाच धक्का बसला पण ती काहीच करु शकत नव्हती आणि मग आमिरने किरणसाठी रिनाला घटस्फोट दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special story of Aamir Khan birthday about his love story