Happy Birthday Atif Aslam : सिंगर होण्याआधी अतिफ होता पाकिस्तानचा क्रिकेटपटू!

वृत्तसंस्था
Thursday, 12 March 2020

आजचा योगायोग म्हणजे भारतातील प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल आणि पाकिस्तानी गायक अतिफ अस्लम या दोघांचाही वाढदिवस असतो. 

काही वर्षांपूर्वी आपल्या दर्दी आणि सुंदर आवाजामुळे सगळ्यांनाच आपल्या प्रेमात पडायला लावणाऱ्या अतिफ अस्लमचा आज ३६वा वाढदिवस! आजही त्याच्या आवाजाची जादू चाहत्यांच्या मनावर आहे. आजचा योगायोग म्हणजे भारतातील प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल आणि पाकिस्तानी गायक अतिफ अस्लम या दोघांचाही वाढदिवस असतो. 

Happy Birthday Shreya : ...म्हणून लीला भन्साळींनी घेतला श्रेया घोषालचा शोध!

अतिफ हा पाकिस्तानी गायक असल्यामुळे त्याला अनेक वादांनाही सामोरे जावे लागले. मात्र कलेला कोणत्याही सीमा नसल्यामुळे आजही भारतीय चाहता त्याचं गाणं तितक्याच आवडीने ऐकतो. आदत, तेरे संग यारा, पेहली दफा, पेहली नजर में ही व अशी अनेक गाणी आजही ऐकली जातात. तुम्हाला अतिफ अस्लम बाबत अशा काही हटके गोष्टी माहिती आहेत का... ज्या तुम्ही कधीच ऐकल्या नसतील.

१. तुम्हाला माहिती आहे का, अतिफचं पहिलं प्रेम हे गाणं नसून क्रिकेट होतं. तो एक उत्तम क्रिकेटर होता. तो पाकिस्तानकडून अंडर१९ च्या टीममध्ये खेळला होता. फास्ट बॉलर म्हणून तो खेळायचा. त्याच्या पालकांना त्याला डॉक्टर करायचे होते, मात्र असिफने कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केले मात्र करिअर गायनात केले. 

atif-aslam-playing-cricket

२. अतिफने 'बोल' या चित्रपटापासून अभिनेता व प्ले बॅक सिंगर म्हणून सुरवात केली. या चित्रपटाताल 'होना था प्यार' हे गाणे प्रचंड गाजले होते. २०१० मध्ये आलेल्या या चित्रपटाने प्रचंड कमाई केली होती. 

poster-bol

३. पाकिस्तानात सर्वोच्च समजला जाणारा तमगा-ए-इम्तियाज हा पुरस्कार मिळवणारा अतिफ हा वयाने सर्वात लहान गायक आहे. या प्रतिष्ठित पुरस्कारामुळे त्याचे कलाक्षेत्रात प्रचंड कौतुक झाले होते. 

Happy Birthday Shreya : पहिल्याच सिनेमासाठी श्रेया ठरली बेस्ट प्लेबॅक सिंगर

atif7-with-award5

४. संगीत आणि कॉम्प्युटर सोडून अतिफला स्केचिंग आवडतं. 'मला लोकांचे निरीक्षण करायला आवडतं. मी डोळ्यात पाहून सांगू शकतो की समोरच्या व्यक्तिला काय हवंय. मी मित्रही असेल बनवतो' असे त्याने एका मुलाखतीत सांगितले होते. 

५. अतिफला तीन भाऊ आहेत. तिन्ही भावांमध्ये तो सर्वात लहान व सगळ्यांचा लाडका आहे. 

atif-aslam-brothers

६. अतिफची लव्हस्टोरी ही खूप गाजली होती. सारा भरवानासोबत तो रिलेशनशिपमध्ये होता. त्यांच्या लग्नामुळे बरेच वाद झाले होते, पण कालांतराने त्यांचे लग्न झाले. त्या दोघांना आता अहाद नावाचा गोंडस मुलगा आहे. 

Image result for atif aslam family

७. अतिफने केवळ पाकिस्तानी व भारतीय चित्रपटांसाठी काम केले नाही, तर तो हॉलिवूडपर्यंत पोहोचला होता. अमेरिकन चित्रपट 'मॅन पुश कार्ट' या चित्रपटासाठी त्याला नॅशनल अॅवॉर्डही मिळाला आहे. 

८. भारतीय कलासृष्टीतील वरूण धवन, रणबीर कपूर, मोहीत चौहान, बिपाशा बासू, मिका सिंग हे अतिफचे खास मित्र आहेत.

Image result for atif aslam family

९. २००९ मध्ये अतिफबाबत एक अफवा पसरली होती. अतिफला घशाचा कॅन्सर झाला असून तो आता गाणं गाऊ शकणार नाही, अशी ती अफवा होती. या अफवेमुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला होता, मात्र तो सुखरूप असल्याची बातमी आल्यानंतर त्याचे चाहते आनंदी झाले होते. 

१०. अतिफला केवळ पाकिस्तानातच नाही, तर परदेशातही अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले होते. मलेशियात ब्रँडलॉरेट इंटरनॅशनल ब्रँण्ड पर्सनॅलिटी या पुरस्काराने अतिफला गौरविण्यात आले.     

530680_519646021378795_1844095656_n


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special story of unknown facts about Atif Aslam on his birthday