टायगरच्या आवाजातला स्पायडर मॅन 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 जून 2017

बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ हॉलीवूड चित्रपट "स्पाईडर मॅन : होमकमिंग'च्या हिंदी व्हर्जनमधील स्पायडर मॅनच्या भूमिकेला आवाज देणार आहे. टायगरनं पहिल्यांदा हॉलीवूडपटासाठी आवाज दिलाय आणि तो खूप उत्सुक आहे. तो म्हणाला की, "मी स्पायडर मॅनचे चित्रपट पाहून मोठा झालो आहे.

मला ही भूमिका साकारायची होती आणि मी खूप खूश आहे की सोनी पिक्‍चर्स एण्टरटेन्मेंट इंडियाने मला "स्पाईडर मॅन : होमकमिंग'साठी माझी निवड केली. हा सिनेमा खूप मजेशीर आणि ऍक्‍शनची परिपूर्ण मेजवानी देणारा असेल आणि स्पाईडर मॅनच्या इतर चित्रपटांपेक्षा नक्कीच वेगळा असेल.' टायगर "स्पाईडर मॅन : होमकमिंग' या चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत असून प्रेक्षकांना माझा स्पाईडर मॅनला दिलेला आवाज नक्कीच भावेल, अशी आशा त्याने व्यक्त केली. जॉन वॉट्‌स दिग्दर्शित "स्पाईडर मॅन : होमकमिंग' हॉलीवूडपटात टॉम हॉलॅंडने र्स्पीाडर मॅनची भूमिका साकारली आहे आणि माईकल कीटोनने खलनायकाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 7 जुलैला भारतात इंग्रजी, हिंदी, तमीळ आणि तेलगुमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Spider Man in Tiger's Sound