तुमच्याबद्दल वाईट पसरवणारे.. Aai Kuthe Kay Karte फेम अश्विनी महांगडे कोणाबद्दल म्हणाली? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ashvini mahangade, aai kuthe kay karte

तुमच्याबद्दल वाईट पसरवणारे.. Aai Kuthe Kay Karte फेम अश्विनी महांगडे कोणाबद्दल म्हणाली?

Ashvini Mahangade News: आई कुठे काय करते मालिकेत अश्विनी महांगडे सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असते. अश्विनी लोकप्रिय अभिनेत्री आहेच शिवाय ती विविध उपक्रमांमधून सामाजिक भान जपत असते.

अश्विनी आई कुठे काय करते मालिकेत अनघाची भूमिका साकारत आहे. अश्विनीची एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. ज्यात अश्विनीने तिचं परखड मत स्पष्ट केलंय.

(Spreading wrong things about you.. Aai Kuthe Kay Karte fame Ashvini Mahangde post viral)

अश्विनीने सोशल मीडियावर हात जोडणारा एक फोटो पोस्ट केलाय. या फोटोखाली अश्विनी लिहिते.. तुमच्याबद्दल चांगले बोलणारे असतात तसे वाईट पसरवणारे सुद्धा असतातच.

त्यांच्यासाठी एकच गोष्ट पुरेशी आहे ती म्हणजे तुमच्या नजरेतला विश्वास. कोणी वाईट असो वा चांगले सगळ्यांसमोर हात जोडणे आपली संस्कृती आहे आणि "गनिमी कावा" आपला इतिहास.. अशी पोस्ट अश्विनीने शेयर केलीय.

अश्विनी हि पोस्ट नेमकी कोणाबद्दल केलीय याबद्दल अद्याप खुलासा झाला नाहीये. दरम्यान शिवजयंती निमित्त अश्विनी वाईला गेली होती. तिथे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर अश्विनी महांगडे नतमस्तक झाली.

अश्विनीने स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत राणूआक्कांची दमदार भूमिका साकारली. रयतेचं स्वराज्य संस्थान प्रतिष्ठान हि अश्विनीची सामाजिक संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून अश्विनी विविध सामाजिक उपक्रम राबवते शिवाय समाजातील गरजूंना मदत करते

अश्विनीने तिच्या संस्थेअंतर्गत शिवजयंती साजरी केली. हि शिवजयंती विशेष चर्चेत राहिली. अश्विनीच्या संस्थेतर्फे वाईला एका मैदानात शिवजयंती साजरी करण्यात आली. या मैदानात खास JCB आणण्यात आला.

या JCB वर शिवरायांची प्रतिमा असलेलं पोस्टर दिमाखात फडकवण्यात आलं. या प्रतिमेत फुलांचा समावेश होता. त्यामुळे प्रतिमा संपूर्ण फडकताच महाराजांच्या प्रतिमेवर अनोखी पुष्पवृष्टी झाली.

अश्विनी सध्या आई कुठे काय करते मालिकेत काम असून हि मालिका सोमवार ते शनिवार ७.३० वाजता स्टार प्रवाह वर पाहायला मिळेल.

मधुराणी प्रभुलकर, मिलिंद गवळी, ओंकार गोवर्धन, इला भाटे अशा कलाकारांच्या कुठे काय करते मालिकेत महत्वाच्या भूमिका आहेत. मालिकेत सध्या अरुंधती आणि आशुतोष याच्या लग्नाचा ट्रॅक सुरु आहे.

टॅग्स :Marathi Actress