स्पृहा आणि गश्मीरच्या 'प्राॅब्लेम'चं पहिले पोस्टर आले

टीम ई सकाळ
सोमवार, 12 जून 2017

मुंबई : आजकालच्या धकाधकीच्या जीवनात सगळे इतके बिझी झालेयत की फॅमिली टाईमही कन्सेप्ट दुर्लक्षित होत चालली आहे. काम काम काम आणि त्यातून बाहेर आलं की प्रत्येकाचे स्वतःच्या प्रॉब्लेम्सचे गुणगान! अरे देवा... इथे प्रत्येकालाच आपले प्रॉब्लेम्स किती मोठे वाटतात ना? अशा वेळी 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' असं म्हणणाऱ्या कोणाची हाक ऐकू आली की सगळ्यांच्या नजरा कशा त्यांच्याकडे एकवटतात. या सिनेमाचे पोस्टर सोशल मिडीयावर लाॅच करण्यात आले. 

स्पृहा आणि गश्मीर बरोबर मराठी चित्रपट सृष्टीतील निर्मिती सावंत, कमलेश सावंत, विजय निकम, मंगल केंकरे, साहील कोपर्डे, सीमा देशमुख, आरश गोडबोले, स्नेहलता वसईक व सतीश आळेकर यांसारखे नामवंत कलाकारही या सिनेमात काम करतायत. 

नक्की काय गडबड आहे काही एक कळायला मार्ग नाहीये. ह्यांना खरंच काहीच प्रॉब्लेम्स नसतील का? की आपले प्रॉब्लेम्स लपविण्यासाठीचा हा त्यांचा अट्टाहास सुरु आहे? येत्या २८ जुलै ला ह्याचा उलगडा होईलच. या सिनेमाचे दिग्दर्शन समीर विद्वांस यांनी केले आहे. 

Web Title: spruha gashmir poster