Abuse Case : मुलाखतीत महिला अँकरला शिवीगाळ; अभिनेत्याला अटकेनंतर जामिनावर सोडले

यूट्यूब चॅनेलच्या अँकरला मुलाखत देत होता
Sreenath Bhasi News
Sreenath Bhasi NewsSreenath Bhasi News

Sreenath Bhasi News दक्षिण इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेता श्रीनाथ भासी याला सोमवारी केरळमधील कोची येथे महिला अँकरसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. प्रकरण एका मुलाखतीशी संबंधित आहे. श्रीनाथ चट्टांबी चित्रपटाचे प्रमोशन करीत होता. यूट्यूब चॅनलवरील मुलाखतीदरम्यान त्याने महिला पत्रकाराशी गैरवर्तन केले. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले आहे.

श्रीनाथ भासी चित्रपट चट्टांबीच्या प्रमोशनच्या निमित्ताने यूट्यूब चॅनेलच्या अँकरला मुलाखत देत होता. मुलाखतीदरम्यान अँकरने श्रीनाथला विचारले की मल्याळम चित्रपटातील कलाकारांना त्यांच्या राउडी शैलीनुसार किती नंबर द्यायचे आहेत. हा प्रश्न ऐकताच श्रीनाथला अचानक राग आला. त्याने कॅमेरा बंद केल्यानंतर महिला अँकर आणि क्रू मेंबर्सना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

Sreenath Bhasi News
Mouni Roy : मौनी रॉयचा राखाडी ड्रेसमध्ये फोटोशूट

मुलाखतीदरम्यान महिला अँकरला अशाप्रकारे वागणूक दिल्याने तातडीने कारवाई करण्यात आली. महिला अँकरने गेल्या आठवड्यात श्रीनाथवर गुन्हा दाखल केला होता. श्रीनाथला आयपीसीच्या कलम ३५४A(१), ५०९ आणि २९४B अंतर्गत अटक करण्यात आली. श्रीनाथ हा जामिनावर सुटला आहे.

श्रीनाथची कारकीर्द

श्रीनाथने मल्याळम इंडस्ट्रीत सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता म्हणून नाव कमावले आहे. तो मॉलवुडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. श्रीनाथच्या चित्रपटांच्या यादीत चप्पल, होम, सुमेश आणि रमेश यासारख्या चित्रपटांची नावे आघाडीवर आहेत. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे चट्टांबी या चित्रपटातून तो पहिल्यांदाच मल्याळम चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी तो इंडस्ट्रीत केवळ साइड ॲक्टर म्हणून दिसला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com