खन्ना खानदान आणि श्रीदेवी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 जुलै 2017

अभिनय सम्राज्ञी श्रीदेवीने 1989 मध्ये अभिनेते विनोद खन्ना यांच्यासोबत "चांदनी' या सिनेमात काम केलं होतं. त्यानंतर ती आता "मॉम' सिनेमात त्यांचा मुलगा अक्षय खन्नासोबत काम करत आहे.

यावर श्रीदेवी म्हणाली की, याची कल्पनाच नव्हती. हे सारं नकळत जुळून आलं. मी "चांदनी'च्या सेटवर अक्षय खन्नाला भेटले होते. तेव्हा असं वाटलं नव्हतं की पुढे जाऊन कधी आम्ही एकत्र काम करू किंवा स्क्रीन शेअर करू. अक्षय खूप चांगला अभिनेता आहे.

तो अभिनय करताना स्वतःला झोकून देतो. त्याच्यासोबत काम करताना खूप छान वाटलं. "मॉम'च्या प्रमोशनच्या निमित्ताने श्रीदेवी दिल्लीला गेली होती. तिथे तिने तिचं हे मत व्यक्त केलं. "इंग्लिश विंग्लिश'नंतर श्रीदेवीचा हा "मॉम' येतोय; पण शशी गोडबोलेच्या रूपातील आई आणि "मॉम'मधील आई यातलं वेगळेपण ट्रेलरमधून आपण पाहिलंच आहे.

"मॉम'मधील ही आई अतिशय खंबीर आहे. या सिनेमात श्रीदेवी, अक्षय खन्ना, नवाजुद्दीन सिद्दीकी, साजल अली यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. विनोद खन्ना आणि अक्षय खन्ना या पिता-पुत्राच्या जोडीसोबत श्रीदेवीने काम केलंय. हा तसा दुर्मिळ योग. श्रीदेवीच्या 50 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये असे अनेक दुर्मिळ योग जुळून आलेत.

कारण श्रीदेवी हे सिने क्षेत्रातील सोनेरी पान आहे. तिच्या बोलण्यातील सहजता, तिचे बोलके डोळे, तिचं हास्य, वागण्यातील नम्रता आजही तिच्या चाहत्यांना आश्‍चर्यचकीत करते.  

Web Title: Sridevi and Akshaye Khanna in MOM movie