#Sridevi श्रीदेवीच्या जन्मदिनी तिच्या आठवणींना उजाळा...

सोमवार, 13 ऑगस्ट 2018

बालवयातच तमिळ चित्रपटांपासून सुरवात केलेल्या श्रीदेवीने नंतर तेलुगु, मल्याळम, कन्नड व हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमावले, प्रेक्षकांचीही पसंती व प्रेम तिला मोठ्या प्रमाणात मिळाले. अभिनयातील निरागसपणा, सच्चेपणा व झोकून काम करण्याच्या तिच्या स्वभावामुळे तिनं अनेक दशकं चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं.

चित्रपटसृष्टीत ऐंशीचे दशक गाजवलेली, प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी, तिच्या निखळ हास्याने मोहून टाकणारी हवाहवाई अर्थात श्रीदेवीचा आज (ता. 13) पंचावन्नावा जन्मदिन. याच वर्षी 24 फेब्रुवारीला तिचे निधन झाले व सगळ्या चित्रपटसृष्टीने हळहळ व्यक्त केली.

shridevi

13 ऑगस्ट 1963 रोजी तमिळनाडुतील शिवकाशी येथे तिचा जन्म झाला. बालवयातच तमिळ चित्रपटांपासून सुरवात केलेल्या श्रीदेवीने नंतर तेलुगु, मल्याळम, कन्नड व हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमावले, प्रेक्षकांचीही पसंती व प्रेम तिला मोठ्या प्रमाणात मिळाले. अभिनयातील निरागसपणा, सच्चेपणा व झोकून काम करण्याच्या तिच्या स्वभावामुळे तिनं अनेक दशकं चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं.

Related image

आज तिच्या जन्मदिनी तिच्या कुटूंबातील सगळ्यांनी तिची आठवण काढली. श्रीदेवीची मुलगी जान्हवी हिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत श्रीदेवीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या फोटोला काहीच कॅप्शन न देता तिने निःशब्द भावना व्यक्त केली आहे, त्यामुळे हा फोटोच सर्व काही बोलून जातो.

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

तर एका संकेतस्थळाला मुलाखत देताना श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांनी 'काही प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व कधीच मरण पावत नाहीत, श्री आमच्यातच आहे, आम्हाला प्रत्येक क्षणी तिची आठवण येते' अशा भावना व्यक्त केल्या.

boney kapoor shridevi

कुटूंबियांशिवाय चाहते व चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनीही तिला जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. चांदनी, सदमा, इंग्लिश विंग्लिश या चित्रपटांमुळे ती कायम आपल्या स्मरणात राहिल.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sridevi remebering sridevi on her birth anniversary