श्रीदेवीचा कौतुक सोहळा 

 sridevi
sridevi

हिंदी सिने तारे-तारकांचा रंगारंगी कार्यक्रम म्हणजे विविध चित्रपट पुरस्कार सोहळे. नवीन वर्षाची सुरुवात झाली की अशा पुरस्कार सोहळ्यांना जणू काही पेवच फुटलेले असते. "झी सिने अवॉर्ड' सोहळा त्यापैकीच एक. दर वर्षी दिमाखात रंगणारा हा सोहळा या वर्षीही तसाच दिमाखात पार पडला. या वर्षीच्या सोहळ्याचे विशेष म्हणजे फारसा कधीही पुरस्कार सोहळ्यांना उपस्थित न राहणारा सलमान खान या सोहळ्याला उपस्थित राहिला होता. तो तिथे गेला, त्याने पाहिले आणि त्याने जिंकले... असेच काहिसे म्हणावे लागेल. कोणत्या पुरस्काराबद्दल हे म्हणत नाही आहोत तर बोलत आहोत ते अभिनेत्री श्रीदेवीबद्दल. सलमान खानने श्रीदेवी ही तीनही खानांना भारी पडली आहे, असे जाहीरच करून टाकले. तो म्हणाला, "मी, शाहरूख, आमीर आम्ही सगळ्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपट केले असतील. आमीरने 50, शाहरूखने 100 अशा आम्ही सगळ्यांनी मिळून जवळपास 250 ते 275 चित्रपट केले असतील; पण आम्हाला मात देत श्रीदेवीने 300हून अधिक चित्रपट केले आहेत आणि तेही विविध भाषांमध्ये. ती आईपासून अगदी चार्ली चॅपलीनपर्यंत अगदी कोणतीही भूमिका करू शकते आणि तिने ते सिद्ध करून दाखविले आहे,' अशा शब्दांत सलमानने श्रीदेवीचे तोंड दुखेस्तोवर कौतुक केले. हे ऐकून श्रीदेवीला भरून आले नसेल तर नवलच! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com