'पठाण' ने पुन्हा रचला इतिहास, या दिवशी बांगलादेशात प्रदर्शित होणार किंग खानचा चित्रपट Shah Rukh Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shah Rukh Khan

Shah Rukh Khan: 'पठाण' ने पुन्हा रचला इतिहास, या दिवशी बांगलादेशात प्रदर्शित होणार किंग खानचा चित्रपट

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्टारर 'पठाण' या वर्षातील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक होता. अॅक्शन थ्रिलरने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड मोडले. या चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर 1050 कोटींहून अधिक कमाई केली. यासह 'पठाण' हा हिंदी चित्रपटांच्या इतिहासात जगभरात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

त्याचवेळी हा चित्रपट आणखी एक यश मिळवणार आहे. 'पठाण' बांगलादेशमध्ये रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे फाळणीनंतर बांगलादेशात प्रदर्शित होणारा हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे.

'पठाण' 12 मे रोजी बांगलादेशमध्ये रिलीज होत आहे. तर इंटरनॅशनल डिस्ट्रिब्युशनचे उपाध्यक्ष नेल्सन डिसुझा म्हणाले, "सिनेमा नेहमीच राष्ट्र, वंश आणि संस्कृती यांच्यात एकीकरण करणारी शक्ती आहे.

चित्रपट हे माध्यम सीमा ओलांडतो, लोकांना प्रेरणा देतो आणि लोकांना एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. जगभरात ऐतिहासिक व्यवसाय करणाऱ्या पठाणला आता बांगलादेशमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची संधी मिळणार"

ते पुढे म्हणाले, “1971 नंतर बांगलादेशात रिलीज होणारा पठाण हा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे आणि या निर्णयाबद्दल आम्ही अधिकाऱ्यांचे आभारी आहोत. शाहरुख खानचे बांगलादेशात खूप मोठे चाहते आहेत हे आम्ही गेल्या काही वर्षांत पाहिले आहे. शाहरुख आणि हिंदी चित्रपट देशात प्रदर्शित करण्यासाठी हा एक परिपूर्ण चित्रपट आहे."

'पठाण'मधून चार वर्षांच्या ब्रेकनंतर शाहरुखने रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले. या चित्रपटात त्याने पहिल्यांदाच जॉन अब्राहमसोबत स्क्रीन स्पेस शेअर केली. या चित्रपटात सलमान खाननेही कॅमिओ केला होता. दुसरीकडे, शाहरुख खान लवकरच अॅटली दिग्दर्शित 'जवान'मध्ये दिसणार आहे.