संजय लीला भन्साळींचं एक पाऊल मागे; राजामौलींनी मानले आभार | Sanjay Leela Bhansali | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Leela Bhansali and SS Rajamouli

संजय लीला भन्साळींचं एक पाऊल मागे; राजामौलींनी मानले आभार

sakal_logo
By
स्वाती वेमूल

कलाविश्वातील दोन नामवंत, प्रतिभावान दिग्दर्शक संजय लीला भन्साळी Sanjay Leela Bhansali आणि एस. एस. राजामौली SS Rajamouli यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. भन्साळींचा 'गंगुबाई काठियावाडी' Gangubai Kathiawadi तर राजामौलींचा 'RRR' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'गंगुबाई काठियावाडी' हा चित्रपट पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार होता. मात्र पुन्हा एकदा या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. राजामौलींच्या 'RRR' या चित्रपटाशी टक्कर टाळण्यासाठी आणि दोन्ही चित्रपटांचा तोटा टाळण्यासाठी भन्साळींनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. यासाठी राजामौलींनी त्यांचे मनापासून आभार मानले आहेत. राजामौलींनी ट्विट करत निर्माते जयंतीलाल गडा आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांचे आभार मानले आहेत.

'चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा जयंतीलाल गडा आणि संजय लीला भन्साळींचा निर्णय कौतुकास्पद आहे. गंगुबाई काठियावाडी या चित्रपटाला आमच्याकडून खूप शुभेच्छा', असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. 'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिका साकारत आहे. तर राजामौलींच्या 'RRR' या चित्रपटातही ती महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. याआधीही अनेकदा या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच निर्मात्यांनी ६ जानेवारी २०२२ ही तारीख निश्चित केली होती. मात्र 'RRR' हा चित्रपट ७ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. दोन्ही बिग बजेट चित्रपट आहेत. त्यामुळे भन्साळींनी प्रदर्शनाची तारीख एक महिना पुढे ढकलली. आता 'गंगुबाई काठियावाडी' हा चित्रपट १८ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा: "..तेव्हा हिंदू खलनायक का खटकले नाहीत?"; रोहित शेट्टीचा सवाल

हुसैन झैदी यांच्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकातून भन्साळींना गंगूबाई हे पात्र सापडलं. गंगुबाई या कामाठीपुरात वेश्या व्यवसाय करत होत्या. त्यांचीच भूमिका आलिया भट्ट चित्रपटात साकारत आहे. आलिया पहिल्यांदाच एका बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारतेय. याचसोबत तिचा भन्साळींसोबतचा हा पहिलाच चित्रपट आहे.

loading image
go to top