'स्टार प्रवाह'चं 'फेक मत मुंबई'चं आवाहन

टीम ई सकाळ
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

कुठल्याही चांगल्या गोष्टीला व्यापक रुप दिलं, तर त्याचा मोठा परिणाम घडून येतो. स्वच्छतेविषयी, विशेषत: कचरा न फेकण्याविषयी गणेशोत्सवासारख्या मोठ्या उत्सवाच्या माध्यमातून जनजागृती 'फेक मत मुंबई' या अनोख्या मोहिमेद्वारे करण्यात आलं. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह 'स्टार प्रवाह'च्या 'लेक माझी लाडकी' या मालिकेतील कलाकारांनी या मोहिमेत घेतलेला सहभाग हे या मोहिमेचं वैशिष्ट्य ठरलं. या मोहिमेला मोठा प्रतिसादही मिळाला.

मुंबई : कुठल्याही चांगल्या गोष्टीला व्यापक रुप दिलं, तर त्याचा मोठा परिणाम घडून येतो. स्वच्छतेविषयी, विशेषत: कचरा न फेकण्याविषयी गणेशोत्सवासारख्या मोठ्या उत्सवाच्या माध्यमातून जनजागृती 'फेक मत मुंबई' या अनोख्या मोहिमेद्वारे करण्यात आलं. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह 'स्टार प्रवाह'च्या 'लेक माझी लाडकी' या मालिकेतील कलाकारांनी या मोहिमेत घेतलेला सहभाग हे या मोहिमेचं वैशिष्ट्य ठरलं. या मोहिमेला मोठा प्रतिसादही मिळाला.
 
गणेशोत्सव हा मुंबईतला सर्वांत मोठा सण. मात्र, गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात कचरा रस्त्यावर आणि इतरत्र फेकला जातो. त्यातून स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर, क्लब महिंद्रा, द सेंटर फॉर सोशल अँड बिहेवियर चेंज कम्युनिकेशन (एस.बी.सी३), कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (सी.आय.आय) यांनी एकत्र येत सामाजिक जागृतीसाठी 'फेक मत मुंबई' ही अनोखी मोहीम हाती घेतली. या विषयाचं महत्त्व लक्षात घेऊन स्टार प्रवाहनंदेखील त्याला पाठिंबा दिला. गणेश मंडळे, शाळा, महाविद्यालये अशा विविध ठिकाणी ही जागृती मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, कचरा फेकू नका, प्लॅस्टिक कचरा कमी करण्यासाठी पाण्याच्या प्लॅस्टिक बाटल्यांचा वापर न करण्याचे आवाहन करण्यात आले. 
 
स्टार प्रवाहच्या 'लेक माझी लाडकी' या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर आणि सायली देवधर यांनी या मोहिमेत सहभाग घेऊन कचरा न फेकण्याविषयी आवाहन केलं. त्याशिवाय एचआर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता आणि कचरा फेकण्याचे दुष्परिणाम या विषयावरील पथनाट्याचे  जी.एस.बी वडाळा या गणेश मंडळा परिसरात विविध ठिकाणी सादरीकरण  करण्यात आले. जी.एस.बी. गणेश मंडळ आणि गणेश भक्तांनीही या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत या मोहिमेचं कौतुक केलं.

Web Title: star prawah new initiative Fek mat esakal news