‘ऐश्‍वर्या ब्युटी पार्लर’; च्या आरशाच्या चौकटीतलं सौंदर्य...!

State Drama Commpition
State Drama Commpition

काेल्हापूर : स्त्रीचं सौंदर्य आणि त्याविषयी प्रत्येकाचे विचार वेगवेगळे. अशाच विचारांचं सर्वांगीण मंथन घडवत भारतवीर मित्र मंडळाच्या बॅनरखाली मंगळवारी ‘ऐश्‍वर्या ब्युटी पार्लर’ या नाटकाचा सफाईदार प्रयोग स्पर्धेत रंगला. विद्यासागर अध्यापक लिखित आणि दिग्दर्शित या नाटकानं आरशाच्या चौकटीत बंदिस्त झालेल्या सौंदर्याकडं पाहण्याचा एकूणच दृिष्टकोन मांडताना त्यातील मार्केटिंगच्या विळख्यावर खरमरीत भाष्य केले. 
 

अंजली यांचं ऐश्‍वर्या ब्युटी पार्लर. या पार्लरच्या जोरावरच त्या मुलांची शिक्षणं आणि संसाराचा गाडा हाकत असतात. पती प्रतापराव स्थानिक राजकारणात सक्रिय. संसाराशी त्यांचं काही तसं देणंघेणं नाही. ऐश्‍वर्या ही त्यांचीच मुलगी. मात्र, ती दिसायला सुंदर नसल्यानं सासर सोडून माहेरी आलेली.

वेगऴया वाटेचा प्रवास

एकटेपणा आणि नैराश्‍यातून ती पुस्तकं वाचायला लागते आणि सौंदर्याचं बाजारीकरण आणि त्यामागील मार्केटिंगचा फंडा तिला त्यातून समजत जातो आणि त्याचमुळे मग ती आईला पार्लर बंद करून दुसरा व्यवसाय सुरवात करण्याची विनंती करते. मात्र, आईला ही गोष्ट मान्य नसल्यानं ऐश्‍वर्या पार्लर बंद करण्यासाठी विविध युक्‍त्या लढवते. प्रॉडक्‍ट घेऊन येणाऱ्या पांडेला ती ॲसिडची भीती दाखवते. 

सौंदर्याची अणाेखी  व्याख्या  
पार्लरचे सारे साहित्य कुलूपबंद करते. मात्र, तिचे हे सारे प्रयत्न अयशस्वी ठरतात. त्यात मार्केटींगच्या जगातल्या ‘नेव्हर’चं गणित तिला पांडे समजावून सांगतो. एकूणच परिस्थितीशी ती लढते. मात्र, अखेर तिलाच पार्लरची धुरा सांभाळावी लागते. या साऱ्या कथानकात मग सुधा काकू, शहनाज, डॉली, माधुरी या व्यक्तिरेखाही भेटतात. प्रत्येकाची कथा आणि त्यांची सौंदर्याची 
व्याख्या वेगळी. 

कलाकारांनी  प्रभावीपणे न्याय दिला

एकूणच नाटक हे जसे सौंदर्याची विविध अंगं उलगडते. तसेच ते त्यामागील आंतरराष्ट्रीय राजकारणाचाही वेध घेते. सुशिक्षित, अन्यायाविरोधात लढणाऱ्या महिलांना एकदा आरशाच्या चौकटीत नेऊन बसवलं की त्या मग त्यातच रममाण होतात आणि प्रस्थापित व्यवस्था त्यात कशी यशस्वी होत राहते, यातील कंगोरेही तितक्‍याच ताकदीने उलगडते. एकूणच संहितेला कलाकारांनी जितका प्रभावीपणे न्याय दिला तितकाच हा प्रयोग सर्व तंत्रज्ञांनी अधिक देखणा केला.  

पात्र परिचय
  रंजन कुलकर्णी (अंजली), सुकुमार पाटील (प्रतापराव), मीरा आजगावकर (सुधा काकू), प्रमोद फडतरे (पांडे), श्‍वेता मोकाशी-कुलकर्णी (ऐश्‍वर्या), रसिका कुलकर्णी (शहनाज), पूर्वा कोडोलीकर (डॉली), अनिता ढवळे (माधुरी).

  दिग्दर्शक  : विद्यासागर अध्यापक
  निर्मितीप्रमुख : सुषमा शितोळे
  प्रकाश योजना:  ऋषीकेष पवार, विनय गोखले
  नेपथ्य : आकाश झेंडे, शुभम चेचर
  संगीत दिग्दर्शन  : अभिजित चव्हाण
संगीत संयोजन : श्रेयस मोहिते
  रंगभूषा  : सदा सूर्यवंशी
  वेशभूषा  :आसमा मुल्ला
  रंगमंच व्यवस्था : सिद्धार्थ बदी, ऋषीकेश बासोपिया, पुष्पक पांढरब

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com