वयात आलेली नाटकं..!

वयात आलेली नाटकं..!

राज्य नाट्य स्पर्धा आणि वयात आलेल्या नाटकांचं वैर असण्याचं काहीच कारण नाही. ज्यांना ज्या कलाकृती भावतात, ते त्या प्रामाणिकपणे स्पर्धेत सादर करण्यासाठी प्रयत्न करत असतात. वारणानगरच्या प्रज्ञान कला अकादमीनं सोमवारी तब्बल साडेचार दशकांपूर्वी मराठी रंगभूमीवर वयात आलेलं नाटक, असं ज्या नाटकाला संबोधलं गेलं, तेच चि. त्र्यं. खानोलकर यांचं ‘अवध्य’ हे नाटक स्पर्धेत सादर केलं. 

तसं पाहिलं, तर हे नाटक यापूर्वीही अनेक संस्थांनी हौशी असो किंवा व्यावसायिक रंगभूमीवर अनेक वेळा आणलं. स्पर्धेच्या निमित्तानं पुन्हा ते आता नव्या पिढीसमोर आलं. मुळात खानोलकरांची नाटकं रंगमंचावर आणणं, हेच एक शिवधनुष्य. त्यातही ‘अवध्य’ म्हणजे आणखीन जबाबदारी वाढते. मात्र, वारणानगरसारख्या भागात जाणीवपूर्वक रंगभूमीविषयक काम करणाऱ्या ‘प्रज्ञान’नं ते सादर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे, हे प्रशंसनीय. किंबहुना प्रत्येक वर्षी वेगवेगळी शिवधनुष्यं पेलण्याचाच ही टीम प्रयत्न करते. साडेचार दशकांपूर्वीचा काळ आता बदलला असला तरी शारीरिक संबंध, प्रणय आणि त्याबाबत काहींची असलेली विकृती अद्याप कमी झालेली नाही.

इव्ह-ॲडमपासून ते सध्याच्या ‘मी-टू’पर्यंतचा सारा प्रवास पाहता काळ बदलला, तरी या गोष्टींकडे पाहण्याची प्रत्येकाची मानसिकता वेगळी असल्याचे स्पष्ट आहे आणि म्हणूनच ‘अवध्य’मधील ‘झरोका’ नावाचं प्रकरण असो किंवा एकूणच नाटकातून होणारं भाष्य आजही तितकंच लागू पडतं आणि म्हणूनच ‘प्रज्ञान’च्या टीमनं ते स्पर्धेच्या निमित्तानं पुन्हा रंगमंचावर आणलं. त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांचे कौतुकच...! 

पात्र परिचय ः
नीलेश आवटी (गंगाधर), विकास मिनेकर (नाचणे), स्नेहल कुलकर्णी (कांचन), प्रवीण वरेकर (पंढरी), सौरभ कदम (गंगाधर २), शिवकुमार कदम (मालक), निवास लोखंडे (सावंत), शिरीष शेवडे (पोतदार), शिवकुमार लंबे (संजय), अमिता इंगळे, नेहा आवटी (नीला), नक्षत्रा आवटी (पाकोळी), सरदार तिवडे (म्हातारा).

 दिग्दर्शक ः नीलेश आवटी
 रंगभूषा ः नेहा आवटी
 नेपथ्य ः मंगेश कांबळे
 संगीत ः केदार सोनटक्‍के
 प्रकाशयोजना ः विनायक सुतार
 वेशभूषा ः अनिल यादव
 निर्मिती प्रमुख ः रमेश हराळे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com