टॉम अन्‌ जेरीचा निखळ प्रयोग...!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 डिसेंबर 2018

नवरा-बायकोचा संसार, हा तसा अनेक नाटकांचा विषय. त्यातल्या त्यात विनोदी अंगांनी जाणाऱ्या नाटकांत तर हमखास हा विषय येतोच येतो. अशाच विषयावर बेतलेलं ‘संसार टॉम अँड जेरीचा’ या नाटकाचा प्रयोग शुक्रवारी राज्य नाट्य स्पर्धेत सादर केला. लाईन बझारच्या शिवतेज तरुण मंडळाच्या बॅनरखाली अभिजित सोकांडे आणि त्यांच्या टीमनं हा धम्माल अनुभव रसिकांना देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. अभिजितनेच हे नाटक स्पर्धेसाठी लिहिले आणि त्याचे दिग्दर्शनही केले.     

टॉम आणि जेरीच्या प्रेमप्रकरणातून या नाटकाला प्रारंभ होतो. मात्र, विवाहानंतर त्यांचा संसार सुरू होतो आणि पुढे एकमेकांचा जीव घेण्याच्या विचारापर्यंत दोघेही जातात. दरम्यान, त्यांच्यात होणारे वाद आणि त्यातून रंगणारे खुमासदार संवाद, त्यातही टॉमची आई आणि वडील या दोन्ही व्यक्तिरेखाही नाटक अधिक रंगतदार होण्यासाठी तितक्‍याच पूरक ठरतात. वाघमारे नावाचं हे सरदार घराणं. टॉमची आई दुर्गादेवी तापट स्वभावाची. वडील मात्र घाबरट. या कुटुंबातला टॉम म्हणजे महाबिलंदर मुलगा. वाघमारे घराण्याचे शत्रू असलेल्या दीडशहाणेंच्या घरातील मुलगी जेरीलाच तो पटवतो आणि पुढे तिच्याशी लग्न करतो आणि नाटक पुढे रंगत जातं. थोडक्‍यात काय तर हास्याचे फवारे उडवत हे नाटक जरी रंगलं तरीही ते संसार कसाही असला तरी नवरा आणि बायको हेच एकमेकांचे आयुष्यभराचे साथीदार असतात, असा संदेश देत ते संपतं. 

पात्र परिचय...
 अभिजित सोकांडे (टॉम), प्रणोती कुमठेकर (टॉमची आई), नम्रता साळोखे (जेरी), एन. डी. चौगले (टॉमचे वडील).

 दिग्दर्शक ः अभिजित सोकांडे
 सहायक दिग्दर्शन ः हर्षाली रोडगे
 व्यवस्थापन ः मनीषा सोकांडे
 नेपथ्य ः प्रतीक्षा रेपे
 प्रकाश योजना ः रोहित जोशी
 पार्श्‍वसंगीत ः संजय पटवर्धन
 रंगभूषा ः निकिता बाबर
 सहायक ः अरुण कुंभार, प्रकाश शिंगे, अमोल टवाळे, अस्मिता नरके, सुधाकर तोडकर, अमित कामते, सचिन हातके, समीर भोरे, अमोल नाईक.    

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Drama competition