esakal | प्रबोधनात्मक ‘गर्भाशयाची गोष्ट’
sakal

बोलून बातमी शोधा

प्रबोधनात्मक ‘गर्भाशयाची गोष्ट’

प्रबोधनात्मक ‘गर्भाशयाची गोष्ट’

sakal_logo
By
संभाजी गंडमाळे

यशोधरा पंचशील थिएटर ॲकॅडमीच्या ‘एका गर्भाशयाची गोष्ट’ या नाटकाने गुरुवारी राज्य नाट्य स्पर्धेच्या येथील प्राथमिक फेरीची दिमाखदार सांगता झाली. स्त्री भ्रूण हत्या आणि एकूणच मानसिकता या विषयावर सर्वांगीण वेध घेत एक चांगला प्रयोग ‘यशोधरा पंचशील’च्या टीमनं सादर केला. 

माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात भौतिक सुविधा वाढल्या. जग फार झपाट्यानं बदलल्याची चर्चा होते. मात्र, आजही मुलगा आणि मुलगी हा भेद समूळ नष्ट झालेला नाही. त्यातूनच स्त्री भ्रूण हत्यांचे प्रमाण आजही अधिक आहे. केवळ अशिक्षितच नव्हे तर सुशिक्षित म्हणवल्या जाणाऱ्या कुटुंबातही ही मानसिकता आहे. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर हे नाटक तळमळीनं बोलतं. 

मुग्धाला पहिली मुलगी आहे आणि तिच्या सासूला तिला दुसरा मुलगाच हवा आहे. त्यामुळे मग ती पुन्हा गर्भवती राहिल्यास मुलगा असेल तर ठीक नाहीतर गर्भपात, असेच समीकरण बनून जाते. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर लेखक व दिग्दर्शक लक्ष्मण द्रविड यांनी एक चांगला प्रयोग सादर करण्याचा प्रयत्न केला.

पात्र परिचय
 शीतल रावत (मुग्धा), दीक्षा चव्हाण (डॉक्‍टर), हर्ष कांबळे (संतोष वाघ), गार्गी चौगले (स्नेहा), मानसी पंडित (रंजना पोतदार), स्वरूप गोडसे (राहुल), साधना माळी (सरिता), निकिता मस्तूद (ॲड. हेमाली) मिलिंद ओक (अण्णा), संतराम जाधव (इन्स्पेक्‍टर), अमृता माने (महिला पोलीस), शैलेंद्र पंडित (फिर्यादी वकील), लक्ष्मण द्रविड (बेलिफ), निखिल प्रभू (कोर्ट क्‍लार्क), नरहरी गोडसे (न्यायाधीश).

 दिग्दर्शन सहाय्य : 
मानसी पंडित
 प्रकाश योजना : 
राहुल माणगावकर
 नेपथ्य : निखिल प्रभू
 रंगभूषा, वेशभूषा : 
सीमा माने
 संगीत : राजकुमार द्रविड

loading image