एकता कपूरच्या माफीनाम्यानंतरही नाराज प्रेक्षकांची तिच्या घरावर दगडफेक

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Wednesday, 9 September 2020

ही दगडफेक एक वेबसिरीज 'वर्जिन भास्कर २' मधील एका दृश्याचा विरोध दर्शवण्यासाठी करण्यात आली. या वेबसिरीजमध्ये एक हॉस्टेल दाखवण्याल आलं आहे जिथे काही चुकीचं कामं केली जातात. आणि त्या हॉस्टेलचं नाव होतं अहिल्याबाई.

मुंबई- हिंदी सिनेमे आणि टीव्ही मालिकांची निर्माती एकता कपूर हिच्या जुहु येथील बंगल्यावर मोठ्या प्रमाणात दगडफेक झाल्यानंतर या भागातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ही दगडफेक एक वेबसिरीज 'वर्जिन भास्कर २' मधील एका दृश्याचा विरोध दर्शवण्यासाठी करण्यात आली. या वेबसिरीजमध्ये एक हॉस्टेल दाखवण्याल आलं आहे जिथे काही चुकीचं कामं केली जातात. आणि त्या हॉस्टेलचं नाव होतं अहिल्याबाई.

हे ही वाचा:  प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेते केविन डॉब्सन यांचं निधन  

या सीनचा विरोध अहिल्याबाई होळकर यांचे वंशज भूषण सिंह राजे होळकर यांनी देखील केला आहे. त्यांनी यावर आक्षेप घेत एकता कपूरच्या प्रोडक्शन हाऊसला एक पत्र लिहिलं आहे. भूषणने अपील केलं आहे की 'एकता कपूर निर्मित या बेव सिरीजमधील तो सीन काढून टाकला जावा तसंच तीने माफी मागावी. जर तिने असं केलं नाही तर तिच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.' 

एकता कपूरने हे लक्षात घेऊन सोशल मिडीयावर तिचा माफीनामा सादर केला आणि ही माहिती दिली की तिच्या या वेबसिरीजमधून हा सीन काढून टाकण्यात आला आहे. एकताने तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय, 'माझ्या लक्षात आलं आहे की वर्जिन भास्कर २मध्ये एका सीनमध्ये दाखवल्या गेलेल्या हॉस्टेलच्या नावावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. आणि त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. मात्र या सीनचा उद्देश कोणाचा अपमान करण्यासाठी नव्हता. आम्ही सिरीजमधल्या हॉस्टेलच्या नावात अहिल्याबाई हे केवळ सुरुवातीचं नाव वापरलं आहे त्यांचं आडनाव नाही. तरी देखील हा सीन आम्ही सिरीजमधून काढून टाकला आहे. मी माझ्या टीमच्या वतीने माफी मागते.'

Ekta Kapoor apologises for hurting sentiments after AltBalaji web show uses  the name Ahilyabai - bollywood - Hindustan Times

एकता कपूरच्या घरावर ही दगडफेक माफीनामा सादर केल्यानंतर झाली आहे. या दगडफेकीमध्ये तिच्या घरातील काही खिडक्या तुटल्या आहेत आणि थोडं नुकसान झालं आहे.   

stone pelting at ekta kapoor home after her apologises for hurting sentiments in virgin bhasskar 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: stone pelting at ekta kapoor home after her apologises for hurting sentiments in virgin bhasskar 2