नाव मोठं लक्षण खोटं;गोष्ट दिवाळीतल्या 'फ्लॉप' चित्रपटांची

युगंधर ताजणे
Sunday, 15 November 2020

अनेक निर्माते, दिग्दर्शक मोठ्या प्रमाणावर फायदा होईल असा विचार करुन जाणीवपूर्वक दिवाळीच्या दिवशी चित्रपट रिलीज करतात. त्याचा त्य़ांना फायदाऐवजी तोटाच झाला आहे. दिवाळीला फ्लॉप झालेल्या काही चित्रपटांचा घेतलेला आढावा. 

मुंबई - दिवाळीत चित्रपट प्रदर्शित करण्याचा फंडा तसा जुना आहे. बदलत्या काळानुसार त्यात काही फार फरक पडलेला नाही. मात्र बॉलीवूडमध्ये रिलीज झालेल्या चित्रपटांकडे पाहिल्यास त्यांना बॉक्स ऑफिसवर पुरेसं यश मिळालेलं नाही.

अनेक निर्माते, दिग्दर्शक मोठ्या प्रमाणावर फायदा होईल असा विचार करुन जाणीवपूर्वक दिवाळीच्या दिवशी चित्रपट रिलीज करतात. त्याचा त्य़ांना फायदाऐवजी तोटाच झाला आहे. दिवाळीला फ्लॉप झालेल्या काही चित्रपटांचा घेतलेला आढावा. 

1. मेड इन चायना - राजकुमार राव, मौनी रॉय आणि बमन इराणी यांची भूमिका असलेला हा मुव्ही फ्लॉप झाला होता. तो काही फार चालला नाही. त्याला प्रेक्षकांची फारशी पसंतीही मिळाली नाही. 2019 मध्ये आलेला हा चित्रपटाकडून निर्मात्यांकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र मेड इन चायनाला रसिकांनी स्वीकारले नाही. या चित्रपटाची स्पर्धा अक्षय कुमारच्या हाऊसफुल्ल 4 बरोबर होती. 

Made In China review: Rajkummar Rao and Boman Irani stiffen up this quirky,  comic enterprise

2. ब्लू - 2009 साली अक्षय कुमारच्या या चित्रपटाने प्रेक्षकांची निराशा केली. विशेष म्हणजे मोठे बजेट असणा-या ब्ल्यु ला बॉक्स ऑफिसवर कमाई करणे अवघड होऊन बसले होते. त्यावर्षीचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट म्हणून ब्ल्यु चे नाव घ्यावे लागेल.

A R Rahman, Kylie Minogue, Sonu Nigam, Sukhvinder Singh, Shreya Ghoshal,  Rashid Ali, Blaaze, Raqeeb Alam, Sonu Kakkar, Jaspreet Singh, Neha Kakkar,  Dilshad, Madhushree, Ujjaiyinee Roy, Udit Narayan - Blue (2009) (A R

3. एक्शन रिप्ले- अक्षय कुमार आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यासारखे बडे कलाकार असतानाही हा चित्रपट काही चालला नाही. त्यातील गाणी मात्र हिट झाली होती. 2010 साली रिलीज झालेल्या या चित्रपटाला त्यावर्षी गोलमाल 3 बरोबर स्पर्धा करावी लागली होती. गोलमाल पुढे एक्शन रिप्लेचे काही चालले नाही. 

Action Replayy Full Movie HD | Akshay Kumar Hindi Movie | Aishwarya Rai |  Superhit Bollywood Movie - YouTube

4. सावरिया - रणबीर कपूरन आणि सोनम कपूरने या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. 2007 मध्ये दिवाळीच्या वेळी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिध्द दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांनी केले होते. भव्य सेट, सुश्राव्य गाणी यामुळे सावरिया लक्षात राहिला. मात्र त्याला म्हणावं असं यश मिळालं नाही. 

Saawariya 2007 Wallpapers | salman-khansonam-kapoor - Bollywood Hungama

5. शिवाय - आता जशी अजय देवगणची हवा आहे. तशी ती 2017 मध्ये एवढी काही नव्हती. तसे असते तर निर्माता आणि एक अभिनेता म्हणून त्याचा शिवाय हा चित्रपट चालला असता. प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. त्यावेळी रणबीर कपूर, अनुष्का आणि ऐश्वर्याचा ऐ दिल है मुश्किल प्रदर्शित झाला होता. वादाचा सामना करावा लागलेल्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. 

Ajay Devgan's Shivaay Will Not Release In Pakistan! - शिवाय को पाक में  रिलीज नहीं करेंगे अजय, ऐ दिल है मुश्किल पर असमंजस - Amar Ujala Hindi News  Live

6. ठग्स ऑफ हिंदुस्थान - नाव मोठं आणि लक्षण खोटं याचा प्रत्यय हा सिनेमा पाहून त्यावेळी प्रेक्षकांची खूप निराशा झाली होती. बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन, अमिर खान यांच्यासारखे दिग्गज कलाकार असतानाही हा चित्रपट फार कमाई करु शकला नव्हता. प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर या चित्रपटावर टीका केली होती. 

Thugs Of Hindustan Motion Poster: Aamir Khan Introduces The 'Biggest Thug  Of All' - Amitabh Bachchan As Khudabaksh - News Front

7. उमराव जान - रेखाच्या उमराव जानचा रिमेक असलेल्या या चित्रपटात ऐश्वर्याने काम केले होते. तर दिग्दर्शन जे पी दत्ता यांचे होते. अभिषेक बच्चननेही यात भूमिका केली होती. त्या दोघांच्या अभिनयाचे कौतूकही केलं गेलं. मात्र बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची कमाई निराशाजनक होती.

Umrao Jaan

8. सांड की आंख - हाऊसफुल्ल 4 बरोबर या चित्रपटाची लढाई होती. त्यात त्याला अपय़श आले. मात्र तापसी पन्नू पन्नु आणि भूमी पेडणेकर यांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी दाद दिली. कमाईच्या बाबत हा चित्रपट अपयशी ठरला. 

Saand ki Aankh' created a rage at the box office on the first day, know the  opening day collection | NewsTrack English 1


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Story of bollywood flop movie released in Diwali festival