बादशहाला व्हायचं होतं आयएएस अधिकारी, झाला 'रॅपर'

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 19 November 2020

बादशहाला वाढदिवसानिमित्ताने चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानेही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करुन त्यांना धन्यवाद दिले आहेत.

मुंबई - बादशहाचं गाणं आताच्या नव्या पिढीला आवडत नाही असे होणार नाही. आपल्या आगळ्या वेगळ्या गाणी आणि गायकी यामुळे तो तरुणाईच्या आवडीचा बनला आहे. सध्याच्या घडीला बादशहा हा भारतातला आघाडीचा रॅप सिंगर आहे. त्याची लोकप्रियता मोठी आहे. गाण्याची, गायनाची आवड असलेल्या बादशहाचं स्वप्न काही वेगळंच होतं.

बादशहाला वाढदिवसानिमित्ताने त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानेही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करुन त्यांना धन्यवाद दिले आहेत. बादशहाच्या आयुष्याशी संबंधित अशा काही गोष्टी आहेत ज्या त्याच्या चाहत्यांना फारशा माहिती नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by BADSHAH (@badboyshah)

बादशहाच्या प्रत्येक गाण्याला मिळणा-या लाईक्स आणि हिटसची संख्या लाखोंच्या घरात आहे. चाहत्यांना गाण्यातून निखळ आनंद देणा-या बादशहाचं व्यक्तिमत्व एकदम साधेसं आहे.

Badshah (rapper) - Wikipedia

अनेकांना तो रागीट किंवा करड्या शिस्तीचा वाटतो. प्रत्यक्षात आपल्या स्वभावाने लक्ष वेधून घेणा-या बादशहाच्या प्रत्येक गाण्यात एकप्रकारचा वेगळेपणा जाणवतो. 

Rapper Badshah to be again probed by Mumbai crime branch in social media  fake followers scam, 238 questions await him | People News | Zee News

बादशाहचे खरे नाव आदित्य प्रतिक सिंह सिसोदिया असून तो हरियाणा येथे राहणारा आहे. तो एक फॅमिली मॅन आहे.

Rapper Badshah paid Rs 72 lakh for 7.2 cr views: Mumbai Police

2006 मध्ये बादशहाने मुंडीर नावाच्या एका क्रु सोबत करियरला सुरुवात केली होती. त्याने गेट अप जवानी या आपल्या अल्बममध्ये यो यो हनी सिंग याच्याबरोबरही काम केलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by BADSHAH (@badboyshah)

शाळेत, महाविद्यालयात असताना त्याला गणित विषयाची फार आवड होती. त्याला एक रॅपर नव्हे तर आयएएस अधिकारी व्हायचं होतं. असं त्यानं एका वृत्तवाहिनीला मुलाखतीत सांगितले.

Indian rapper Badshah breaks streaming record, fans say YouTube hasn't  acknowledged it - National | Globalnews.ca

डीजे वाले बाबु हे आस्था गिल बरोबर असलेलं त्याचं गाणं सर्वाधिक लोकप्रिय आहे. 2015 मध्ये रिलीज झालेलं हे गाणं काही वेळातच आय ट्युन्सच्या यादीत नंबर एकवर जाऊन पोहचले होते. 

Badshah releases latest single 'Ilzaam'; fans love the 'heartfelt' rap song

सतत प्रयत्न, संघर्ष आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर त्याने स्वतला घडवले असल्याचे म्हटले आहे. आपल्या कामाच्या प्रति आदर ठेवून प्रामाणिकपणे ते काम केल्यास यश हमखास मिळते यावर बादशहाचा पूर्ण विश्वास आहे. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Story of rap singer Badshah celebrate his 35th birthday on November 19