'स्टुडंट ऑफ द ईयर 2' सिनेमाला एक वर्ष पूर्ण झाल्याने अनन्याची खास पोस्ट

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 May 2020

अनन्याचा 'स्टुडंट ऑफ द ईयर 2' हा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरला होता. या चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. याबद्दल अनन्याने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

मुंबई : अभिनेत्री अनन्या पांडेने 'स्टुडंट ऑफ द ईयर 2' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटातून तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. अभिनाबरोबरच ती तिच्या लूक्स आणि सुंदरतेमुळे नेहमीच चर्चेत असते. अनन्याचा 'स्टुडंट ऑफ द ईयर 2' हा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरला होता. तिच्यासोबत या चित्रपटात अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री तारा सुतारिया देखील झळकले होते. या चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. याबद्दल अनन्याने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

हे ही वाचा: कल्कीचं मुलीसाठी स्पेशल गाणं, मुलीचा हा क्युट व्हिडिओ होतोय व्हायरल

ही पोस्ट शेअर करत तिने कॅप्शन लिहिले आहे की, ''स्टुडंट ऑफ द ईयर 2'  चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झालं. आणि मी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. यातूनच मी माझी पहिली स्क्रीन टेस्ट, माझ्या पहिल्या स्क्रिप्टचे वाचन, माझा पहिला दिग्दर्शक, माझे पहिले सहकलाकार, माझा पहिला शॉट, माझा पहिला डायलॉग, माझं पाहिलं साँग शूट, माझा पहिला स्टंट आणि माझा पहिला ट्रेलर लाँच या सगळ्या गोष्टी माझ्याबरोबर पहिल्यांदाच घडल्या आणि त्या माझ्यासाठी खूप स्पेशल आहेत. आपल्या सर्वांकडून खूप प्रेम मिळाल्याबद्दल धन्यवाद. मी चित्रपटाच्या संपूर्ण कलाकार आणि क्रूचे आभारी आहे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

1 year of SOTY 2 today

A post shared by Ananya (@ananyapanday) on

ही पोस्ट शेअर करताना आठवणींना उजाळा देत तिने या चित्रपटाच्या चित्रीकरणा वेळेचे काही फोटो शेअर केले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुनीत मल्होत्राने केले होते तर या चित्रपटाची निर्मिती करण जोहर, हीरो यश जोहर आणि अपूर्व मेहता यांनी धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली केली आहे. या चित्रपटानंतर तिने 'पती, पत्नी और वो' चित्रपट केला तो बॉक्स ऑफिसवर हिट ठरला.  

Tiger Shroff, Ananya Pandey celebrate one year of 'Student of the ...

Student of the year 2 completes 2 years ananya pandey celebrates her first year  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student of the year 2 completes 2 years ananya pandey celebrates her first year