'स्टूडंट ऑफ द इयर 2'ची प्रतिक्षा संपली; ट्रेलर प्रदर्शित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

तारा सुतारिया आणि अनन्या पांडे या अभिनेत्री 'स्टूडंट ऑफ द इयर 2' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. टायगर श्रॉफ जरी चित्रपटसृष्टीला नवीन नसला तरी त्याचा अंदाज या चित्रपटात जरा हटके दिसेल.

टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि अनन्या पांडे स्टारर बहुचर्चित चित्रपट 'स्टूडंट ऑफ द इयर 2' ची प्रतिक्षा संपली आहे. हा चित्रपट 10 मे ला प्रदर्शित होणार आहे. काही वेळापूर्वीच यु ट्यूबवर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 

हा ट्रेलर बघितल्यानंतर दिसणारे फ्रेश चेहरे प्रेक्षकांचे कुतूहल वाढविणारे आहे. तारा सुतारिया आणि अनन्या पांडे या अभिनेत्री 'स्टूडंट ऑफ द इयर 2' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. टायगर श्रॉफ जरी चित्रपटसृष्टीला नवीन नसला तरी त्याचा अंदाज या चित्रपटात जरा हटके दिसेल. टायगर आणि फायटिंग सीन्स हे समीकरण तर ठरलेलेच आहे. पण काहीसा भावनिक टच देखील टायगरच्या भूमिकेला देण्यात आला आहे. 

 

2012 ला आलेल्या 'स्टूडंट ऑफ द इयर' मध्ये सिध्दार्थ मल्होत्रा आणि वरुण धवन यांच्या अडकलेली आलिया भट्ट अशी स्टोरी होती. पण भाग 2 मध्ये तारा आणि अनन्या मध्ये अडकलेला टायगर अशी काहीशी चित्रपटाची कहाणी असेल. अनन्या ला आजपर्यंत आपण अनेक बॉलिवूड पार्टी, अवॉर्ड सोहळ्यात बघितले असेल, तेव्हा दिसणारा भोळा चेहरा नक्कीच या चित्रपटात नाही. तर अनन्या एक श्रीमंत घरातून आलेली नखरे असणारी मुलगी ट्रेलरमध्ये दर्शविण्यात आली आहे. तारा ही ग्लॅमरस दिसत असली तरी तिचा साध्या सरळ स्वभावाची आहे असे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे. 

धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनर खाली या चित्रपटाची निर्मिती झाली आहे. कॉलेज लाईफ, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांची होणारी धावपळ, प्रेम, मैत्री, प्रेमभंग अशा अनेक गोष्टींचे प्रसंग चित्रपटात उभे करण्यात आले आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student Of the Year 2 Trailer Release