'संजयला जेल झाली अन् 'खलनायक' सुपरहीट झाला';सुभाष घई असं का म्हणाले?

दिग्दर्शकाने अनेक वर्षांनी पुन्हा जागवल्या '९३' सालातल्या कटू आठवणी
Subhash Ghai, Sanjay Dutt
Subhash Ghai, Sanjay DuttGoogle

१९९३ सालात सबंध मुंबई बॉम्बस्फोटानं ढवळून निघाली होती. ज्यांनी त्या हल्ल्याचा प्रत्यक्ष दाह सहन केलाय किंवा जे त्या कटू आठवणींचे साक्षीदार होते त्यांचा आजही त्या आठवणींनी थरकाप उडतो. संजय दत्त(Sanjay Dutt) हे नावही त्या सालात खुप गाजलं. नव्हे त्याच्या 'खलनायक' सिनेमापेक्षाही संजय दत्त लोकांच्या आठवणीत राहिला ते 'एके-५६' ही रायफल त्याच्या घरात सापडल्यामुळे. याचा संबंध मुंबई बॉम्बस्फोटाशी लावला गेला. त्याला जेरबंद करण्यात आलं. अनेकजण तेव्हा त्याच्या विरोधात होते,पण जे संजयला त्याच्या लहानपणापासून पाहत आले होते त्यांची मात्र खात्री होती की संजय गुन्हेगार नाही,त्याला फसवण्यात आलंय. यामागे मोठं कटकारस्थान आहे. संजयबाबातीत असा विचार करणाऱ्यांमध्ये संजयच्या 'खलनायक' सिनेमाचे दिग्दर्शक सुभाष घई सुद्धा होते.

Subhash Ghai, Sanjay Dutt
रामायणातील सीतेचा अवतार एकदा पहाच;युजर्सलाही बसला धक्का

खरंतर या गुन्ह्यासाठी संजय दत्तनं शिक्षा भोगलेली आहे. आज तो आपल्या कुटुंबासोबत सुखाचं आयुष्य जगतोय. बॉलीवूडमध्येही त्याचं काम चांगलं सुरू आहे अन् आज तो गुन्हेगारी जगापासून काय,त्यासंदर्भातल्या बातम्यांपासूनही दूर आहे. पण आज अनेक वर्षांनी अचानक सुभाष घई यांनी पुन्हा संजय दत्तविषयी बोलताना म्हटलंय,''संजय निर्दोष होता. हे मला माहीत होतं. आणि आज जरी त्यानं शिक्षा भोगली असली तरी मला वाटतंय त्याने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगली आहे. त्यावेळी मला आठवतंय,'खलनायक' त्याच दरम्यान प्रदर्शित झाला होता. पण संजयच्या बाबतीत इतकं सगळ वाईट घडत असताना मी माझ्या फायद्यासाठी खलनायकचं प्रमोशन टाळलं. एक पैसाही मी त्यावर खर्च केला नाही. त्यात सिनेमातील 'चोली के पिछे' गाण्यावरून माझ्या विरोधात केस सुरू होत्या. पण मी सिनेमात काही चुकीचं दाखवलं नव्हतं,ना गाण्यातनं काही भडक प्रदर्शन केलं होतं. याचाच परिणाम त्यावेळी सगळं नकारात्मक घडत असतानाही खलनायक सुपरहिट झाला. कारण सिनेमा करतानाची माझी भूमिका चांगली होती आणि मुळात संजयला फसवलं गेलंय हे जसं मला वाटत होतं तशी कदाचित सिनेमा पहायला येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाचीही भूमिका असावी. अन्यथा सिनेमा डब्यात गेला असता''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com