सुबोधने दिली आपल्या दोन्ही आॅनस्क्रीन मुलींना ट्रीट

टीम ई सकाळ
रविवार, 18 जून 2017

विक्रम फडणीस निर्मित आणि दिग्दर्शित ‘हृदयांतर’ चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या ट्रेलरमधून चित्रपटातली मुख्य व्यक्तिरेखा शेखर जोशी ह्यांच्याकडे कामाच्या व्यापामुळे आपल्या नित्या आणि नायशा ह्या दोन मुलींसाठी वेळच नसतो, हे समोर आलंय.

मुंबई : विक्रम फडणीस निर्मित आणि दिग्दर्शित ‘हृदयांतर’ चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या ट्रेलरमधून चित्रपटातली मुख्य व्यक्तिरेखा शेखर जोशी ह्यांच्याकडे कामाच्या व्यापामुळे आपल्या नित्या आणि नायशा ह्या दोन मुलींसाठी वेळच नसतो, हे समोर आलंय.
 
‘हृदयांतर’ सिनेमातून मुंबईसारख्या मोठ्या शहरात राहणा-या, आणि आपल्या करीयरच्या मागे धावताना कामाच्या व्यस्ततेमूळे आपल्या मुलांना व्यवस्थित वेळ न देऊ शकणा-या अनेक ‘शेखर जोशीं’ची ही कथा म्हणायला हवी.
ही भूमिका साकारणा-या अभिनेता सुबोध भावेशी ह्यासंदर्भात चर्चा केल्यावर त्याने सांगितले, “काहीही म्हणा, पण ह्या सिनेमाच्या निमीत्ताने दोन गोड मुलींचा बाप बनण्याची माझी इच्छा पूर्ण झाली. कोणीही त्यांच्या प्रेमात पडाव्यात अशा या मुली आहेत.या दोन्ही मुली जेवढ्या लाघवी आहेत, तेवढ्याच समंजसही आहेत. त्यामुळे ह्यांच्यासोबत काम करणं नक्कीच सुखावह होतं.”
 
‘फादर्स डे’ निमीत्ताने सुबोधने नुकतीच त्याच्या दोन्ही ऑनस्क्रिन मुलींना ट्रीट दिली. 

Web Title: subodh bhave father day treat esakal news