esakal | सुबोध भावेचा बाप्पा : 'टोकियो ऑलिम्पिक 2020"चा हटके देखावा!
sakal

बोलून बातमी शोधा

subodh bhave

सुबोध भावेचा बाप्पा : 'टोकियो ऑलिम्पिक 2020"चा हटके देखावा!

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मुंबई : आज गणेशोत्सवाच्या (ganesh festival 2021) दिवशी बाप्पाचे उत्साहात स्वागत करण्यात येत आहे. सामान्यांसह सेलिब्रिटीदेखील बाप्पाच्या आगमनासाठी उत्सुक दिसत आहे. विविध देखाव्यांमध्ये बाप्पाला विराजमान करताना दिसत आहेत. मराठी अभिनेता सुबोध भावेच्या (subodh bhave) घरीदेखील लाडक्या गणेशाचे आगमन झाले आहे. सुबोध भावेच्या घरी देखील यंदा बाप्पासाठी खास देखावा करण्यात आला आहे.

हेही वाचा: आईच्या निधनाच्या २ दिवसानंतर अक्षय कुमार परतणार बॅक टू वर्क!

टोकियो ऑलिम्पिक 2020 चा देखावा

सुबोधच्या घरी यंदा टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारतासाठी पदक मिळवलेल्या सर्व खेळाडूंचा सन्मान आणि त्यांचे कौतुक करणारा देखावा करण्यात आला आहे. सुबोधने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केले आहे. पोस्ट मध्ये सुबोध म्हणतो...

'गणपती बाप्पा मोरया! बाप्पाच आगमन म्हणजेच आनंद आणि समाधान.

या वर्षीचा आमचा देखावा 'टोकियो ऑलिम्पिक 2020"

भारता साठी पदक मिळवलेल्या सर्व खेळाडूंचा सन्मान आणि त्यांचं खूप कौतुक.'

हेही वाचा: देशातील बारा प्रसिद्ध गणपती मंदिरं पाहिलीत?

loading image
go to top