No Mobile In Theater : ...तर यापुढे नाटकात काम करणार नाही- सुबोध भावे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

नाटक सुरु असताना मोबाईल वाजल्याने विचलित झाल्याने अभिनेता सुबोध भावेने यापुढे नाटकातील काम थांबवणे योग्य राहील असे म्हटले आहे.

मुंबई : नाटक सुरु असताना मोबाईल वाजल्याने विचलित झाल्याने अभिनेता सुबोध भावेने यापुढे नाटकातील काम थांबवणे योग्य राहील असे म्हटले आहे.

No Mobile In Theater : कायमस्वरूपी तोडगा निघावा- सुमीत राघवन

सुबोधने म्हटले आहे की, अनेक वेळा सांगून, विनंती करूनही जर नाटक चालू असताना मोबाईल वाजत असतील तर याचा अर्थ आपल्या नाटकात काहीतरी कमी आहे किंवा नाटक संपूर्ण एकरूप होऊन बघण्याची गरज प्रेक्षकांना वाटत नसल्याची चिंता व्यक्त केली असून यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आल्या आहेत.

No Mobile In Theater : जॅमर बसविणे हाच पर्याय- चिन्मय मांडेलकर

यावर सुबोध भावे म्हणतो की, या पुढे नाटकात काम न करणं हा यावर एकच उपाय आहे, अशा आशयाची फेसबुक पोस्ट सुबोध भावे याने लिहली आहे. फोनच्या मध्ये आमची लुडबुड नको. कारण फोन जास्त महत्त्वाचा. नाटक काय टीव्ही वर पण बघता येईल, असे बोलून सुबोध भावे याने प्रेक्षकांविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, प्रेक्षकांच्या अशाच मोबाईल वाजण्याला कंटाळून यापूर्वी अभिनेता सुमीत राघवन यानेही नाटक मध्येच थांबवून नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक जणांनी सुमीत राघवनला पाठींबा दर्शविला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Subodh bhave has disappointed due to mobile ringing in theater