महाराष्ट्र पोलिसांच्या ‘कट्यार काळजात घुसली’ स्टाईल ट्विटला सुबोध भावेचा भन्नाट रिप्लाय

Subodh bhave retweet maharastra police tweet about cyber security
Subodh bhave retweet maharastra police tweet about cyber security

मुंबई : सध्या कोरोना व्हायरसमुळे लागु करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात सर्वजण घरात अडकून पडले आहेत. बऱ्याच जणांनी घरातून काम करण्यास सुरुवात केली आहे, तसेच सोशल मिडीयाचा वापर देखीम मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या दरम्यान वाढत्या सायबर गुन्हांना आटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्र पोलीसांनी ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटाचा संदर्भ वापरला होता, त्यावर चित्रपट अभिनेता सुबोध भावे याने मजेशीर रिप्लाय दिला आहे. 

नागरीकांमघ्ये सायबर गुन्ह्यांविषयी जागृतीसाठी पोलीस वेगवेगळ्या मार्गांचा वापर करतात, तशाच प्रकारचे एक ट्विट मुंबई पोलीसांकडून करण्यात आले होते. या ट्विट मध्ये पोलीसांनी ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटाचे पोस्टर पोस्ट केले आहे. या पोस्टरवर खॉंसाहेब म्हणजे सचिन पिळगावकर दिसत आहेत. त्याखाली “सायबर गुन्ह्याची ‘कट्यार’ तुमच्या अकाउंटमध्ये घुसू देऊ नका! जेव्हा तुम्हाला कोणी- ‘वेगवेगळ्या अकांऊटचे पासवर्ड वेगळे आहेत ना?’ असं विचारतं, तेव्हा अभिमानाने ‘खाँ साहेबांसारखं’ उत्तर द्या…बेशक हमारे पासवर्ड का कोई सानी नहीं. बहुत ही बुलंद और बेमिसाल हैं हमारा पासवर्ड” असे कॅपशन देण्यात आले आहे. 

सुबोघने देखील लगोलग पोलिसांनी केलेले ट्विट रिट्विट करत चित्रपटाच्याच अंदाजत रिप्लाय दिला आहे. सुबोधने पोलिसांच्या या अनोख्या कल्पनेचे कौतुक करत, पोलिसांना शुभेच्छा देत लिहीले की, “वाह वाह महाराष्ट्र पोलीस....तुमच्या कल्पना निरागस सुरा सारख्या आहेत....आपल्या सुरक्षित हातांमध्ये महाराष्ट्राचं "मनमंदिर तेजाने" उजळून निघूदे”

पोलिसांकडून नेहमीच नागरीकांचे लक्ष वेधण्यासाठी अशा वेघवेगळ्या मार्गाचा वापर केला जातो. महाराष्ट्र पोलिसांनी केलेले हे ट्विट त्याचेच एक उदाहरण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com