पूरग्रस्तांना मदत केल्याचा फोटो पाठवू? सुबोध भावे भडकला

Subodh Bhave slams a fans after trolling him over helping flood victims in Kolhapur and Sangli
Subodh Bhave slams a fans after trolling him over helping flood victims in Kolhapur and Sangli

कोल्हापूर : मुसळधार पावसामुळे पंचगंगा आणि कृष्णा नदीला आलेल्या पूरामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापूराने थैमान घातले आहे. अशात मराठी कलाकारांनी पूरग्रस्तांना पाठींबा देण्याचे ट्विट केले. सुबोध भावेने केलेल्या ट्विटवर एका चाहतीने बोलून नाही तर करुन दाखवा अशी कमेंट केल्यावर सुबोधने तिला पैसे दिल्याचा फोटो पाठवी का? असा टोला लगावला आहे. 

दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना सुरशिक्षत स्थळी हलविले जात आहे. कोल्हापूर आणि सांगली हे दोन्ही जिल्हे रसिकप्रेमी म्हणून ओळखले जातात. म्हणूनच मराठी कलाकारांनी महापूरात अडकलेल्या नागरिकांना घाबरु नका आम्ही तुमच्या सोबत आहोत असा विश्वास दिला आहे. ''ज्या कोल्हापूरकर,सांगलीकर रसिकांनी इतकी वर्ष आम्हाला सांभाळलं,आमच्या वर उदंड प्रेम केलं ते संकटात असताना आम्हीही मागे राहू शकत नाही.
आम्ही मराठी नाट्य,चित्रपट आणि दूरचित्रवाणी वरील सर्व कलाकार नेहमी तुमच्या सोबत आहोत,'' असे ट्विट सर्व कलाकरांनी केले आहे.   

मात्र सुबोधच्या ट्विटवर प्रियांका सरवार या चाहतीने जनता तुम्हा कलाकरांचे सिनेमे, मालिका, नाटक आवर्जून बघते, आता तुम्ही ते ऋण फेडायला हवेत. फक्त बोलू नका करुनही दाखवा अशा कमेंट केली. त्यावर सुबोधनेही तिला आम्ही जे करणार आहेत ते आम्हाला सांगायची गरज आहे प्रत्यक्ष दिसेलच असे संयमी उत्तर दिले आहे. 

दरम्यान सुबोधने कोल्हापूर,सातारा, कराड आणि सांगली या ठिकाणी   होणारे "अश्रूंची झाली फुले"चे प्रयोग रद्द केले आहेत. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com