सुबोध भावेचं 'तुला पाहते रे'साठीचं मानधन बघून तुम्ही व्हाल थक्क!

वृत्तसंस्था | Tuesday, 23 July 2019

 'तुला पाहते रे' ही मालिका नुकतीच संपली. त्यानंतर अभिनेता सुबोध भावेला मिळणारे मानधन किती आहे यावर चर्चा होतीये. 

मुंबई : 'तुला पाहते रे' ही मालिका नुकतीच संपली. त्यानंतर अभिनेता सुबोध भावेला मिळणारे मानधन किती आहे यावर चर्चा होतीये. 

सुबोध भावेला प्रत्येक एपिसोडप्रमाणे 35 हजार मानधन दिले जात होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे या मानधनाबाबत जोरदार चर्चा होतीये. 

अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या ‘तुला पाहते रे’ या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मात्र अजूनही प्रेक्षक विक्रांत सरंजामे आणि इशा निमकरला विसरले नाहीयेत.

दरम्यान, सुरूवातीला मालिका 200 एपिसोडमध्ये संपवण्यात येणार होती, मात्र प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद बघून मालिकेने 300 भागांचा टप्पा पार केला.