अनन्या पांडे स्टार दिसण्यामागे आहे शाहरुखची मुलगी सुहानाची मेहनत

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 May 2020

शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने तिच्या लहानपणापासूनची खास मैत्रीण अभिनेत्री अनन्या पांडेसोबत कनेक्ट राहण्यासाठी एक खास पर्याय शोधून काढला आहे.

मुंबई- देशभरात लॉकडाऊन सुरु आहे त्यामुळे अनेक मित्रमैत्रीणी एकमेकांना भेटू शकत नाहीयेत. यात सेलिब्रिटी किड्सचा देखील समावेश आहे. बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने तिच्या लहानपणापासूनची खास मैत्रीण अभिनेत्री अनन्या पांडेसोबत कनेक्ट राहण्यासाठी एक खास पर्याय शोधून काढला आहे.

हे ही वाचा: अभिनेता आमीर खानच्या असिस्टंटच निधन, २५ वर्ष करत होते आमिरसाठी काम

अनन्याने नुकतेच इंस्टाग्रामवर सुहानासोबत संपर्कात असल्याची एक झलक सादर केली होती. ज्यामध्ये सुहानाने अनन्याच्या फोटोशूटमधील काही फोटो एडिट करुन अनन्याला शेअर केले होते. अनन्याने तिच्या खास मैत्रीणीचं हे टॅलेंट जगासमोर आणण्यासाठी इंस्टाग्राम स्टोरीचा आधार घेतला होता. अनन्याने या स्टोरीमध्ये तिचे काही फोटो टाकून त्यामध्ये कॅप्शन दिलं होतं 'एडिटेड बाय द क्वीन सुहाना खान.'

या क्लीपमध्ये अनन्याचे कामाची एक झलक दाखवण्यात आली आहे. अनन्या पांडे आणि सुहाना खान लहानपणापासूनच्या मैत्रीणी आहेत. एकीकडे अनन्याने बॉलीवूडमध्ये 'स्टुडंट ऑफ द इयर २' या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं तर दुसरीकडे शाहरुखची मुलगी सुहाना तिचं शिक्षण पूर्ण करत आहे. सुहानाने मोठ्या पडद्यावर अजुन पदार्पण केलेलं नसलं तरी तिच्या ग्लॅमरसलूकमुळे तिची चांगलीच फॅन फॉलोईंग आहे. तिच्या नावाचा आत्ताच एक फॅन क्लबदेखील आहे.

Ananya Panday REVEALS 5 interesting things about her BFF Suhana Khan

किंग खान शाहरुखचं म्हणणं आहे की सुहानाला जरी बॉलीवूडमध्ये यायची इच्छा असली तरी ती तिचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावरंच  येईल. सुहाना ग्लॅमरस दिसण्यासाठी स्वतःवर वेगवेगळे प्रयोग करत असते. अनेक पार्ट्यांमध्ये सुहाना शाहरुख आणि गौरीसोबत ग्लॅमरस अंदाजात दिसून आली आहे. त्यामुळे तिचे आत्तापासूनंच अनेक चाहते आहेत. सुहाना सध्या परदेशात तिच्या शिक्षणासाठी आहे. तर शाहरुख आणि त्याचं कुटुंब मुंबईत आहे. असं म्हटलं जातं की सुहाना आणि शाहरुखमध्ये खास नातं आहे. मुलांमध्ये सुहाना शाहरुखच्या अत्यंत जवळची आहे.   

suhana khan becomes video editor for childhood bestie ananya pandey  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suhana khan becomes video editor for childhood bestie ananya pandey