सुहाना खानचं अभिनय क्षेत्रात पदार्पण, पहिली शॉर्ट फिल्म रिलिज!

Suhana Khan is gearing up to become an actor
Suhana Khan is gearing up to become an actor

मुंबई: बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींच्या मुलांचीही तितकीच प्रसिद्धी आहे. तैमुर खान, सुहाना, इब्राहिम अली खान न्यासा देवगण, अनाया पांडे हे काही फेमस स्टार किड आहेत. बॉलीवूडमध्ये नेपोटीझम चालतं असा आरोप सगळे लावतात. त्यामुळे कोणता स्टार कीड कधी एन्ट्री करणार याकडे सर्वाचं लक्ष लागून असतं. किंगखान शाहरुखची लेक सुहाना फेमस स्टार किडपैकी एक आहे. बॉलीवूड मध्ये ती पदार्पण करणार असल्याची चर्चा अनेक दिवस सुरू आहे. नुकतीच सुहानाची शॉर्ट फिल्म प्रदर्शित झाली आहे. नेटकऱ्यांमध्ये आणि बि-टाउनमध्ये सध्या त्याचीच चर्चा पाहायला मिळतेय. 

सुहानाची हॉलिवूडमधील शॉर्टफिल्मची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. 'द ग्रे पार्ट ऑफ ब्लू'' असं या फिल्मचं नाव असून ती रिलिज झाली आहे आणि त्यामुळे सुहाना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. सुहाना यामध्ये मुख्य भूमिकेत झळकली असून प्रेक्षकांनी तिच्या अभिनयाची खूप प्रशंसा केली आहे. या फिल्मच्या यशस्वी रिजिलनंतर सुहाना तिच्या मैत्रीणींसोबत पार्टी करताना दिसली.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Suhana khan (@suhana_khan_officiall) on

काही दिवसांपूर्वीच या शॉर्ट फिल्मच्या शुटींगदरम्यानचा फोटोही व्हायरल झाला होता. सुहानाच फॅन फोलोइंग जास्त आहे आणि इन्डस्ट्रीमध्ये पदार्पण करण्याआधीच ती प्रसिद्ध झाली आहे. सुहाना सोशल मीडियावर सतत अॅक्टीव असते. सुहानाला अभिनय क्षेत्रात काम करायचं आहे, तिला अभिनेती बनायचं आहे असं तीनं एका मुलाखतीमध्ये व्यक्त केलं होतं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Suhana khan (@suhana_khan_officiall) on


सुहाना सध्या न्युर्यार्क युनिव्हर्सिटीमध्ये शिकत आहे. फिल्ममेकिंगचे धडे ती सध्या घेतेय. तिच्या अभिनयावरुन असे लक्षात येत लवकरच ती बॉलिवूडमध्येही एन्ट्री करेल यात काही शंका नाही. तिचे इन्स्टाग्रामवरील फोटो अनेकदा व्हायरल होतात.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Suhana khan (@suhana_khan_officiall) on

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com