शाहरुखच्या लेकीचं अभिनय क्षेत्रात पदार्पण, पहिल्या शॉर्ट फिल्मचा टीझर रिलिज

वृत्तसंस्था
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

बी टाउनमध्ये एन्ट्री करण्याआधीच तिने इतर कलाकारांच्या अभिनयाला टक्कर दिली आहे. सुहाना एका शॉर्ट फिल्ममध्ये झळकणार असून नुकतच त्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. 

मुंबई : बॉलिवूड किंगखान शाहरुखची लेक सुहाना फेमस स्टारकिडपैकी एक आहे. बॉलिवूडमध्ये तिने अद्याप पदार्पण केलं नसलं तरी इंटरनेटवर ती सतत चर्चेत असते. लवकरच ती बॉलिवूडध्ये येणार असल्याच्या चर्चादेखील आहेत. मात्र त्याआधीच सुहानाने मोठी झेप घेतली आहे. बी टाउनमध्ये एन्ट्री करण्याआधीच तिने इतर कलाकारांच्या अभिनयाला टक्कर दिली आहे. सुहाना एका शॉर्ट फिल्ममध्ये झळकणार असून नुकतच त्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. 

सुहाना सध्या लंडनच्या  Ardingly College मध्ये शिक्षण घेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने शॉर्ट फिल्मच्या पहिला पोस्टर इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. 'द ग्रे पार्ट ऑफ ब्लू (The Grey Part Of Blue)' असं या शॉर्ट फिल्मचं नाव आहे. त्याचा टीझर प्रदर्शित झाला असून तो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. शिवाय चाहत्यांकडून सुहानाच्या अभिनयाचं कौतुकही केलं जात आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#thegreypartofblue art by @olsdavis

A post shared by Theodore Gimeno (@theodoregimeno) on

सुहानाचा अभिनय नक्कीच इम्प्रेस करणारा आहे. सुहानाच्या एका फॅनपेजवर याचा टीझर अपलोड करण्यात आला आहे. तिच्या कॉलेजमधील क्लासमेटनी ही शॉर्ट फिल्म तयार केली आहे. तिची अभिनयातील आवड पाहून ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल यात काही शंका नाही. सुहाना युकेमध्ये थिएटर आणि सिनेमांचं शिक्षण घेत होती. मागच्या वर्षी तीने एका ड्रामामधून देखील अभिनय साकारला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suhana khan s first ever short film s teaser released