'सुई धागा'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

सोमवार, 13 ऑगस्ट 2018

मेक इन इंडिया या थीमच्या धर्तीवर येत असलेला वरुण धवन आणि अनुष्का शर्मा यांच्या 'सुई धागा' या सिनेमाचा ट्रेलर आज (ता. 13) प्रदर्शित झाला आहे. 28 सप्टेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'यशराज फिल्म्स' बॅनरखाली हा सिनेमा तयार करण्यात आला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून 'मेक इन इंडिया'चा प्रचार करण्यात आला आहे.

मुंबई- मेक इन इंडिया या थीमच्या धर्तीवर येत असलेला वरुण धवन आणि अनुष्का शर्मा यांच्या 'सुई धागा' या सिनेमाचा ट्रेलर आज (ता. 13) प्रदर्शित झाला आहे. 28 सप्टेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'यशराज फिल्म्स' बॅनरखाली हा सिनेमा तयार करण्यात आला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून 'मेक इन इंडिया'चा प्रचार करण्यात आला आहे.

मध्य प्रदेश आणि दिल्लीतील काही ठिकाणी या सिनेमाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. सिनेमात सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या मौजी आणि ममताचं चित्र रेखाटण्यात आलं आहे. सिनेमात वरुणने मौजीची तर अनुष्काने त्याच्या पत्नीची ममताची भूमिका वठविली आहे. सातत्याने आपल्या मालकाकडून अपमानित झाल्यानंतर स्वत:चा व्यवसाय करण्याचा निर्णय ममताच्या सांगण्यावरून मौजी घेतो. या व्यवसायात मौजीला ममताही मदत करते. परंतु, हा व्यवसाय करण्यासाठी त्यांना अनेक आव्हांनाना सामोरे जावे लागते. व्यवसाय करत असताना त्यांनी केलेला संघर्ष या सिनेमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

sui dhaga

'सुई धागा'च्या  निमित्ताने वरुण आणि अनुष्का पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. वरुण आणि अनुष्कासाठी या भूमिका वेगळ्या आणि आव्हानात्मक होत्या असे त्यांनी अनेकवेळा स्पष्ट केलं आहे.

sui dhaga 22


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sui Dhaga Trailer Out Anushka Sharma And Varun Dhawan