सुजॉय घोष लवकरच 'तीन पहेलिया'सोबत छोट्या पडद्यावर 

बुधवार, 18 एप्रिल 2018

'तीन पहेलिया'मध्ये 'गुडलक', 'मिर्ची मालिनी' व 'कॉपी' अशा तीन लघुपटांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे.

'कहानी', 'तीन', 'कहानी 2' यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक व पटकथाकार सुजॉय घोष विविध माध्यमं आजमावून पाहत असून ते लवकरच छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहेत. ते स्टार प्लस वाहिनीवर तीन लघुपट सादर करणार आहेत.

'तीन पहेलिया'मध्ये 'गुडलक', 'मिर्ची मालिनी' व 'कॉपी' अशा तीन लघुपटांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे. हे लघुपट येत्या रविवारी (ता. 22) प्रसारित होणार आहेत. 'गुडलक'मध्ये टीना देसाई व कुणाल रॉय-कपूर, 'मिर्ची मालिनी' लघुपटात पाओली दाम व अक्षय ओबेरॉय आणि 'कॉपी'मध्ये सुरवीन चावला व विक्रांत मेस्सी हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

Teen Paheliya Team

याबाबत सुजॉय घोष सांगतात की, 'हे लघुपट नव्या पिढीतील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतील. माझ्या मनातील संकल्पनांना टेलिव्हिजनवरील छोट्या कालावधीच्या लघुपटांमध्ये बसवणं आणि सादर करण्याचा माझ्यासाठी नवा अनुभव होता. 'तीन पहेलिया' या तिहेरी लघुपटाच्या मालिकेतून प्रेक्षकांना गुंतवून ठेवू शकेन अशी आशा आहे.' 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sujoy Ghosh is Back With Three Short Film On Small Screen