सुखविंदर सिंगच्या गाण्याने "राजा' चित्रपटाचा मुहूर्त 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 25 मार्च 2017

मुंबई : बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग याने मराठी "राजा' चित्रपटासाठी पार्श्‍वगायन केले आहे. त्याने गायलेल्या गाण्याने नुकताच चित्रपटाचा मुहूर्त झाला. "रातभर गावभर होऊ दे बोभाटा... झन झन झनन झनन वाजवू झन्नाटा...' हे गाणे सुखविंदरने गायले आहे. चित्रपटात सुखविंदर त्यावर थिरकताना दिसणार आहे. गाण्याचे नृत्यदिग्दर्शन संतोष भांगरे यांनी केले आहे. गाण्यावर परफॉर्म करताना खूप मजा आली. प्रेक्षक हे गाणे नक्कीच एन्जॉय करतील, असा विश्‍वास सुखविंदरने व्यक्त केला. 

खासदार डॉ. प्रीतम मुंडे, डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. अजिंक्‍य पाटील, मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण दराडे, अतिरिक्त महासंचालक सुरेंद्र पांडे, व्होकार्ड ग्रुपचे अध्यक्ष डॉ. हुज खोराकीवाला, अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रताप दिघावकर, पालिका उपायुक्त रणजीत ढाकणे आदी मान्यवर मुहूर्ताला उपस्थित होते. "राजा' चित्रपट पॉप सिंगरच्या आयुष्यावर आधारित आहे. सत्यसाई मल्टिमीडिया प्रा. लि. चित्रपट निर्मिती संस्थेचे निर्माते प्रवीण काकड यांनी त्याची निर्मिती केली असून सहनिर्मिती नरेश साखरे यांची आहे. चित्रपटाची कथा-पटकथा दिग्दर्शक शशिकांत देशपांडे यांची आहे. वलय मुळगुंद यांच्या गीतांना पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केले आहे. 

Web Title: Sukhwinder Singh renders a Marathi song during the muhurat of film 'Raja'