ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार | Sulochana Latkar Death | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

veteran actress sulochana latkar worship some coins money given by a beggar

Sulochana Latkar Death : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Sulochana Latkar Marathi Actress Death Funnerl mumbai : मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या निधनानं मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. मुंबईतील दादरमधील एका रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंत्यसंस्काराच्यावेळी मराठी, हिंदी मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज सेलिब्रेटी उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील यावेळी सुलोचना लाटकर यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. चाहते, नेटकरी आणि काही कलाकारांनी सोशल मीडियावरुन दीदींना आदरांजली वाहिली आहे. काल मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सुलोचना दीदींना श्रद्धांजली वाहिली होती. अशी आई होणे नाही असे म्हणत त्यांनी दीदींप्रती भावना व्यक्त केल्या होत्या.

Also Read - Self Respect चा प्रवास दूराग्रहाकडे नको

दीदींच्या अंत्यसंस्काराच्यावेळी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवर हजर होते. यापूर्वी दीदींच्या निधनाचे वृत्त कळताच बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र आणि महानायक अमिताभ बच्चन यांनी खास पोस्ट शेयर करत दीदींविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. केवळ मराठीच नाहीतर हिंदी चित्रपटांमध्ये देखील सुलोचना लाटकर यांनी आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला होता.

ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, प्रिया बेर्डे, आशा काळे या अभिनेत्रींनी देखील सुलोचना दीदींसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तब्बल चारशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या सुलोचना दीदींचा प्रवास अनेक कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरला. त्यांच्या जाण्यानं मराठी मनोरंजन विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. जी कधीही न भरुन येणारी आहे.