बंगाली अभिनेत्री सुमिता सन्याल यांचे निधन

टीम ई सकाळ
रविवार, 9 जुलै 2017

बंगाली अभिनेत्री सुमिता सन्याल यांचे काही वेळापूर्वी निधन झाले. दार्जिलिंगमध्ये जन्म झालेल्या सुमिता यांचे मूळ नाव मंजुला सन्याल होते.  त्या 72 वर्षांच्या होत्या. 

मुंबई : बंगाली अभिनेत्री सुमिता सन्याल यांचे काही वेळापूर्वी निधन झाले. दार्जिलिंगमध्ये जन्म झालेल्या सुमिता यांचे मूळ नाव मंजुला सन्याल होते.  त्या 72 वर्षांच्या होत्या. 

मंजुला यांना सुमिता हे नाव दिले होते विभूति लाहा यांनी दिले होते. लाहा यांनी सुमिता यांचे नाव सुचेरिता ठेवले होते. खोका बाबुर या आपल्या चित्रपटावेळी त्यांनी हे नाव सुमिता यांना ठेवले. पण नंतर कनक मुखोपाध्याय यांनी हे नाव छोटे करून सुमिता ठेवले. 

सुमिता यांनी बंगाली भाषेत 40 चित्रपटांमध्ये काम केले. यात सगीना महतो हा चित्रपट दिलीपकुमार यांच्यासोबत केला होता. बंगाली चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी दक्षिणेत व हिंदी सिनेसृष्टीतही काम केले होते. हिंदीत आशीर्वाद, आनंद, गुड्डी, मेरे अपने यांचा समावेश होतो. आनंद या चित्रपटात त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या नायिकेचे काम केले होते. 

Web Title: sumati sanyal passed away esakaal news