
'माझी गाडी परत दे गं बाई', सुंबुलने नवीन गाडीचं स्टेअरिंग धरताच शिवची बत्ती गुल shiv thakare
बिग बॉस जरी संपल असलं तरी बाहेर आल्यानंतर 16 व्या सिझनच्या स्पर्धकांची चर्चा होतच आहेत. ते कुठेही गेले तरी त्याचे चाहते त्यांना फॉलो करत आहेत. त्याचे व्हिडिओ आणि फोटोही सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.
नुकतच मराठमोळ्या शिव ठाकरेने नवीन कार खरेदी केली. ही कार खरेदी करणं हे त्याचं स्वप्न होतं. त्याचा व्हिडिओही समोर आला होता जो बराच व्हायरलही झाला होता. मात्र आता शिवचा दुसराच एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात शिवच्या गाडीचं स्टेअरिंग कुण्या दुसऱ्याच्या हातात आहे आणि शिवच्या मनातली भिती त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.
सुंबुल तौकीर खान आणि शिव ठाकरे बाँडिंग ही चाहत्यांना खुप आवडते. दोघेही एकमेकांना भावा-बहिणीप्रमाणे वागवतात. त्याच्यात मजामस्तीचं वातावरण नेहमीच पहायला मिळतं.
पापा तौकीरच्या इन्स्टाग्रामवरून शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मागच्या सीटवर बसलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ बनवला आहे. ज्यात शिव ठाकरे ओरडतांना दिसत आहे तर सुंबूल गाडी चालवत होती.
यादरम्यान अस्वस्थ झालेला शिव होऊन सुंबूलला म्हणतो, यार माझी गाडी परत दे. मला वर्कआउट करायला जायचं आहे लागेल. यावर सुंबुल उत्तर देते की तिलाही जायचं आहे.
तेव्हा शिव म्हणतो- अगं, जायचं असेल तर काय, नवीन गाडी म्हणजे काय गंमत आहे मित्रा..पहिला दिवस आहे. मग सुंबुल म्हणते, ' तू वर्कआउटला जायचं ना मी तुला सोडते. आणि गाडी घेवुन जाते.' यावर शिव म्हणतो की, 'पहिल्या दिवशी दुसऱ्या गाडींना चुबंन देशील.' यावर सुंबुल म्हणते की, 'मी अजून काही केल नाही आहे. मी पूर्ण काळजीपुर्वक गाडी चालवत आहे. बघ, भीतीमुळे मी जागा बनवत आणि दूर चालत आहे.'
या व्हिडिओत पुढे शिव म्हणतो की, 'नखा इतकही तू लक्ष केंद्रित करत नाहीस. तु कुठेतरी चिकटवशील गाडी.' सुंबुल म्हणते, 'अरे मी किती फोकस आहे हे तु पाहू शकतो.' शेवटी शिव म्हणातो, माझ्या भावनांशी खेळू नकोस यार. सुंबुल म्हणते, 'मी तुझ्या भावनांशी खेळत नाहीये.' शिव घाबरत म्हणतो, 'माझी अवस्था काय होत आहे.' सुंबुल म्हणते की ती छान गाडी चालवत आहे.
हा व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्रीच्या वडिलांनी लिहिले, जेव्हा तुमचा मित्र तुमचा ड्रीम कार चालवतो. मग कोणी घाबरू नये का? आता हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. लोक या व्हिडिओवर कमेंट करत असुन शिववर हसत आहेत तर शिव सोबत संबुलने असं करु नये असा सल्लाही तिला देत आहेत. तर काहींनी या व्हिडिओला त्याच्या खऱ्या आयुष्यासोबत जोडलं आहे आणि प्रतिक्रिया दिली आहे.