सुमित-एकताचे ‘वीरे दी वेडिंग’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

सुमित सध्या त्याची गर्लफ्रेंड एकता कौल हिला डेट करतोय. तो एकताला गेले वर्षभर डेट करतोय. आणि आता त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

बॉलीवूडमध्ये सध्या अनेक जण लग्न करताहेत. प्रत्येकाच्या लग्नाची साधारण महिनाभर चर्चादेखील होतेय. विरूष्का, सोनम-आनंद, मिलिंद सोमण-अंकिता कंवर, नेहा धुपिया-अंगद बेदी, हिमेश रेशमिया-सोनिया कपूर यांच्या लग्नानंतर आता बॉलीवूडचा नवा चेहरा सुमित व्यासही लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. सुमित नुकताच ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात झळकला होता. याआधी त्याने ‘इंग्लिश-विंग्लिश’ या चित्रपटातूनही काम केले होते. सुमित व्यास हा तरुणाईला वेगवेगळ्या वेबसीरिज आणि लघुपटांमुळे जास्त माहिती आहे. त्याने परमनंट रूममेट्‌स, ट्रिपलिंग, बॉर्न फ्री, ऑफिशियल सीईओगिरी वगैरे अनेक वेबसीरिज आणि लघुपटांमधून काम केले आहे.

sumit vyas ekata kaul

सुमित सध्या त्याची गर्लफ्रेंड एकता कौल हिला डेट करतोय. तो एकताला गेले वर्षभर डेट करतोय. आणि आता त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. सुमितचे लग्न म्हणे सप्टेंबर मध्ये जम्मू-काश्‍मिरी रीतिरिवाजाप्रमाणे होणार आहे. सुमित म्हणतो, ‘मी आणि एकता एका शोच्या प्रोमो शूटवेळी भेटलो होतो. त्यानंतर आमचा काहीच कॉन्टॅक्‍ट नव्हता. मागच्या वर्षी मी एकताला एका फ्रेंडच्या पार्टीत भेटलो. त्या वेळी मी एका क्रिकेटवर आधारित शो होस्ट करत होतो आणि एकता त्या शोमध्ये एक खेळाडू म्हणून सहभागी झाली होती.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sumit vyas and eakata kaul engaged